Eknath Shinde : शिंदे निघाले गुवाहाटीला, सुरू झाले राजकीय टोले

गुवाहाटीला जाण्यासाठी एअर इंडियाचं 180 सीटर विमान सज्ज आहे. 

Updated: Nov 25, 2022, 11:03 PM IST
 Eknath Shinde : शिंदे निघाले गुवाहाटीला, सुरू झाले राजकीय टोले title=

मुंबई :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह शिंदे गटाचे आमदार आणि खासदार उद्या आणि परवा पुन्हा गुवाहाटी (Shinde Group Guwahati Tour 2022) दौऱ्यावर जातायत. त्यानिमित्तानं महाराष्ट्रात काय चर्चा आणि टोलेबाजी सुरू झालीय, पाहुया  काय झाडी, काय डोंगर आणि काय हाटील. याचा आनंद लुटायला शिंदे गट पुन्हा गुवाहाटीला निघालाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदें त्यांच्या शिलेदारांसह पुन्हा गुवाहाटीला निघालेत. महाराष्ट्राचं सत्तानाट्य (Maharashtra Politcal Crisis) जिथून सुरू झालं, त्याच भूमीत परत जाऊन शिंदे कामाख्या देवीचं दर्शन घेतील. (eknath shinde group mla guwahati tour 2022 maharashtra politics)

गुवाहाटीला जाण्यासाठी एअर इंडियाचं 180 सीटर विमान सज्ज आहे. सत्तासंघर्षावेळी शिंदे गट आमदार जिथे थांबले होते त्याच रॅडिसन ब्लूमध्ये शिंदे गटाचा मुक्काम असेल. त्यासाठी हॉटेलच्या 100 खोल्या बुक केल्याचं समजतंय.शिंदे गटाचे आमदार आणि खासदार कामाख्या देवीचं दर्शन घेऊन पूजा करणार आहेत. मुख्यमंत्री शिंदेंच्या दौऱ्यासाठी कामाख्या मंदिरातली सुरक्षा वाढवण्यात आलीय. शिंदे गुवाहाटीला निघणार म्हटल्यावर जोरदार राजकीय टोलेबाजी सुरू झालीय...यावेळी कुणाचा बळी देणार, असा मिश्कील सवाल अजित पवारांनी केलाय. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबरोबर यावेळी शिवसेनेतून फुटलेले 12 खासदारही गुवाहाटी दौ-यावर जाणार आहेत. त्याचबरोबर अपक्ष आमदार कोण कोण जाणार, याचीही उत्सुकता आहे. सत्तास्थापनेबद्दल शिंदेंनी कामाख्या देवीला नवस बोलला होता, त्याची पूर्ती करायला हा दौरा असल्याचंही बोललं जातंय. शिंदेंच्या या गुवाहाटी दौ-यानिमित्तानं राज्यात पुन्हा झाडी, डोंगर, बळी आणि रेड्यांची जोरदार चर्चा सुरू होणार हे नक्की.