Dasara Melawa 2022 : शिवाजी पार्कचा आग्रह ठाकरे गटानं सोडला? दसरा मेळव्यासाठी ठाकरे गटाचा प्लॅन बी

शिवतीर्थावर एकनाथ शिंदे (Eknath Shinde Group) गटाचाच दसरा मेळावा होणार हे आता जवळपास निश्चित झालंय.

Updated: Sep 14, 2022, 10:45 PM IST
Dasara Melawa 2022 : शिवाजी पार्कचा आग्रह ठाकरे गटानं सोडला? दसरा मेळव्यासाठी ठाकरे गटाचा प्लॅन बी title=

मनोज कुलकर्णी-कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई :  शिवतीर्थावर एकनाथ शिंदे (Eknath Shinde Group) गटाचाच दसरा मेळावा होणार हे आता जवळपास निश्चित झालंय.  कारण उद्धव ठाकरे गटाकडून (Uddhav Thackeray Group) आता दुसऱ्या जागेसाठी अर्ज करण्यात आलाय. उद्धव ठाकरे गटाचा दसरा मेळावा (Dasara Melawa 2022) कुठे होणार आहे? ठाकरेंचा प्लान बी काय आहे? शिंदे गटाचा हा विजय म्हणायचा का? पाहुयात एक रिपोर्ट. (eknath shinde group and uddhav thackeray group crisis over to dasara melawa 2022)

शिवाजी पार्कवर दसरा मेळावा कोण घेणार यावरुन शिंदे गट आणि ठाकरे गटात चढाओढ सुरु आहे. मात्र आता यात एक ट्विस्ट येण्याची शक्यता आहे. कारण उद्धव ठाकरे गटानं दसरा मेळाव्यासाठी प्लॅन बी तयार ठेवलाय. 

उद्धव ठाकरेंनी बीकेसी मैदानात दसरा मेळाव्यासाठी अर्ज केलाय. अजूनही शिवाजी पार्कवर दसरा मेळावा कोण घेणार यावर शिक्कामोर्तब झालेलं नाही. तरी ठाकरे गटानं बीकेसीसाठी अर्ज केल्यानं शिवतीर्थावर शिंदे गटाचाच मेळावा होईल अशी शक्यता दिसतेय. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत दसरा मेळावा कुठे घ्यायचा यावर शिंदे गटाची बैठक झाली. 

या बैठकीत दसरा मेळाव्याच्या आयोजनाबाबत चर्चा झाली. शिवाजी पार्कवर दसरा मेळावा कुणी घ्यायचा याबाबत सकारात्मक निर्णय होईल असं सुतोवाच एकनाथ शिंदेंनी केलं.

दुसरीकडे शिवाजी पार्क मैदानावर मुंबई महापालिकेनं परवानगी दिली नाही तर बीकेसी मैदानावर दसरा मेळावा घ्यायचा प्लॅन ठाकरे गटानं केलाय. ठाकरे गटाच्या वतीनं भारतीय कामगार सेनेनं बीकेसी मैदानावर दसरा मेळावा घेण्यासाठी अर्ज केलाय. 

महापालिकेकडून शिंदे आणि ठाकरे गटानं केलेल्या अर्जांची पडताळणी सुरु आहे. एकीकडे शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी शिंदे-ठाकरे गटात चढाओढ सुरु असताना ठाकरे गटानं बीकेसी मैदानासाठी अर्ज केलाय, त्यामुळे शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याचा हट्ट ठाकरे गटानं सोडला का अशी चर्चा सुरु झालीय.