Dhananjay Munde यांची तब्बेत बिघडली; रात्री उशीरा रुग्णालयात दाखल

Dhananjay Munde | राज्याच्या सामाजिक न्याय मंत्री आणि राष्ट्रवादी पक्षाचे नेते धनंजय मुंडे यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आल्याने त्यांना तातडीने ब्रिच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Updated: Apr 13, 2022, 05:50 PM IST
Dhananjay Munde यांची तब्बेत बिघडली; रात्री उशीरा रुग्णालयात दाखल title=

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना ह्रदय विकाराचा झटका आल्याची माहिती सुरुवातीला देण्यात आली होती, ही माहिती चुकीची असल्याचं भाजपा नेत्या आणि धनंजय मुंडे यांची बहिण पंकजा मुंडे  यांनी म्हटलं आहे. पंकजा मुंडे यांनी आज धनंजय मुंडे यांच्या प्रकृतीची पाहणी केल्यानंतर ही बातमी समोर आली आहे. 

पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्या प्रकृतीची विचारपूस केल्यानंतर सांगितलं की, 'धनंजय मुंडे यांची प्रकृती स्थिर आहे.धनंजय मुंडे यांना हृदयविकाराचा झटका ही चुकीची माहिती आहे, त्यांना विकनेस आला होता, भोवळ आली होती, सर्व पॅरामिटर्स सध्या चेक होत आहेत, आता ज्या पॅरामिटर्सचे निरोप आले ते सर्व नॉर्मल आहेत, मला अस वाटतं ते नॉर्मल होत आहेत, उद्या ते घरी येतील त्यांची तब्येत नॉर्मल आहे'.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची प्रतिक्रिया

मुंबईतील ब्रिच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ब्रिच कँडी रुग्णालयात जाऊन मुंडे यांच्या तब्बेतीची चौकशी केली.  ते म्हटले की, धनंजय मुंडेंची प्रकृती आता स्थिर असून रुग्णालयातील डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

अजित पवार यांचीही प्रतिक्रिया

धनंजय मुंडेंची तब्येत स्थिर आहे. त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे. दुपारी त्यांना वार्डमध्ये शिफ्ट करतील. त्यांना विश्नांती घ्यायला सांगितली आहे. घाबरण्याचं कोणतंही कारण नाहीये.

उद्या आंबेडकरांची जयंती आहे त्यांच्या विभागाचा कार्यक्रम आहे. आम्ही कार्यक्रम करतो असं त्यांना सांगितलं आहे.  डॉक्टरांनी सांगितलंय आरामाची गरज आहे. कार्यकर्त्यांनी इकडे येऊ नये, धनंजय मुंडे लवकर बरे व्हावे असं वाटत आहात तिथूनचं शुभेच्छा द्याव्यात. आम्ही इथं लक्ष ठेऊन आहोत.