Dasara Melava : दसरा मेळाव्याबाबत उद्धव ठाकरे यांना देवेंद्र फडणवीस यांचा इशारा

Shiv Sena Dasara Melava : भाषण योग्य भाषेत करा नाही तर कायदा त्याचं काम करेल, असा इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिला आहे.  

Updated: Oct 4, 2022, 12:18 PM IST
Dasara Melava : दसरा मेळाव्याबाबत उद्धव ठाकरे यांना देवेंद्र फडणवीस यांचा इशारा title=

मुंबई : Shiv Sena Dasara Melava : भाषण योग्य भाषेत करा नाही तर कायदा त्याचं काम करेल, असा इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिला आहे. भाषणात अतिशयोक्ती अलंकारही वापरायला हरकत नाही पण कायद्याच्या चौकटीत राहून भाषण करा, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना अप्रत्यक्ष फडणवीसांनी दिला आहे.

ठाकरे आणि शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याची (dasara melava shivsena) तयारी अंतिम टप्प्यात आहे. शक्तिप्रदर्शनासाठी राज्यभरातून कार्यकर्ते मुंबईकडे रवाना झाले आहे. शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याच्या माध्यमातून शक्तिप्रदर्शन करण्यासाठी ठाकरे गट सज्ज झाला आहे. मुंबईतल्या छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर होत असलेल्या दसरा मेळाव्यासाठी काही लाख कार्यकर्ते जमवण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती आहे. मुंबईतून किमान 50 हजार तर मुंबईबाहेरुन 50 हजार कार्यकर्ते जमवण्याची रणनीती आखण्यात आली. 

दसरा मेळाव्यासाठी नागपुरातून जवळपास 50 बसेसमधून शिंदे समर्थक मुबंईकडे रवाना होतील. अडीच हजार शिंदे समर्थक शिवसैनिक मुंबईत बीकेसीकडे दसरा मेळाव्यासाठी निघतील. शिंदे गटाच्या दसऱ्या मेळाव्यासाठी नाशिक ग्रामीण भागातून 337 खासगी बस आणि 424 खासगी वाहने सोडण्यात येणार आहे. नाशिक ग्रामीण भागातून 18 हजार नागरिक मुंबईत उद्या रवाना होतील. 

नाशिकमधून ठाकरे गटाच्या दस-या मेळाव्यासाठी 25 हजार शिवसैनिक मुंबईत दाखल होतील.  शिवसेनेकडून 200 खासगी बसेसचं बुकिंग करण्यात आले आहे. प्रत्येक विधानसभा प्रमुखाला सहाशे व्यक्तींच तर शिवसेनेच्या संघटनांना 1000 चे उद्दिष्ट देण्यात आले आहे.. मुंबईत होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी संभाजीनगरमधील 50 ट्कके एस टी बसेस आरक्षित करण्यात आलीत. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांची गैरसोय होणार आहे. एकूण बसेस पैकी अर्ध्या बसेस बुक झाल्यानं प्रवाशी बसस्थानक ताटकळत उभे आहेत. 

दरम्यान, धनुष्यबाणाबाबत 7 ऑक्टोबरला निवडणूक आयोग ( Election Commission) निर्णय घेण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला 7 ऑक्टोबरपर्यंत आपलं म्हणणं मांडण्याची मुदत दिलीय. शिवसेना चिन्हाबाबत ठाकरे गट कोणती कागदपत्रे सोपवणार आणि काय निकाल लागणार याची मोठी उत्सकता आहे. (Uddhav Thackeray has been given a deadline of October 7 to submit his statement by the Election Commission)

27 सप्टेंबर ला सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला शिवसेनेचे निवडणूक चिन्ह कोणाला द्यायचं यावर सुनावणी घेण्याची परवानगी दिली होती. दरम्यान अंधेरी पोटनिवडणूक जाहीर झालीय. पोटनिवडणुकीआधी निवडणूक आयोग धनुष्यबाणाचा निर्णय घेणार अशी शक्यता आहे. त्यामुळे आता 7 ऑक्टोबरला होणाऱ्या निवडणूक आयोगातल्या सुनावणीला महत्त्वं आले आहे.