चंद्रकांत पाटील यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्याबाबत फडणवीसांचं स्पष्टीकरण

चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याबाबतच्या निर्णयावर वक्तव्य केले होते.

Updated: Jul 23, 2022, 05:54 PM IST
चंद्रकांत पाटील यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्याबाबत फडणवीसांचं स्पष्टीकरण title=

मुंबई : पनवेलमध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होत आहे. नुकतेच महाराष्ट्रात सत्तापरिवर्तन झाले आहे. शिवसेनेतील बंडखोरीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाट्यमय पद्धतीने राजीनामा दिला. उद्धव यांच्या राजीनाम्यानंतर भाजपने अचानक मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा करून सर्वांनाच चकित केले. (Devendra Fadnavis explanation regarding Chandrakant Patil's Chief Minister post statement)

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. मात्र, भाजपने एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री का केले, असा सवाल विरोधकांना ही पडला आहे. याबाबत महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं की, हृदयावर दगड ठेवून एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करण्यात आले आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यावर आता स्पष्टीकरण दिले आहे. समारोपाच्या वेळी त्यांनी म्हटलं की, 'एकनाथ शिंदे हे आपले नेते आहेत. आपल्या सर्वांचे नेते शिंदे आहेत. मगाशी चंद्रकांत दादा म्हणाले त्यावर वेगळे अर्थ काढले. आम्ही सर्व प्रक्रियेत एक होतो. माध्यमांचे काम असते. हे सरकार अडीच वर्षे पूर्ण करेल पण पुढे देखील येईल.'

'या संघर्षाच्या दरम्यान केंद्रातील पक्ष आपल्या मागे होता. अमित शहा हे आपल्या मागे चटाना सारखे उभे होते. काही मूर्ख लोक मोदींवर टीका करत होते. मी ठरवलं होतं बाहेर राहून काम करावे. पण मला ज्येष्ठानी सांगितले तू उपमुख्यमंत्री हो. मग मी शपथ घेतली. मला जर माझ्या नेत्यांनी सांगितले असते तू घरी जा तर मी गेलो असतो.' असं ही पुढे फडणवीस म्हणाले.