मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ७ मार्च रोजी अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत अशी माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. अयोध्येला राहुल गांधी यांना सोबत घेऊन जा अशी टीका करणाऱ्या भाजपला राऊत यांनी जोरदार टोला लगावला. भाजपनेच मेहबुबा मुफ्ती सईदला अयोध्येला घेऊन जावं अशी टीका त्यांनी केली.
Sanjay Raut, Shiv Sena: Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray will visit Ayodhya (Uttar Pradesh) on 7th March. pic.twitter.com/v7wHTHJM27
— ANI (@ANI) January 25, 2020
राम जन्मभुमीचा वाद मिटल्यानंतर आणि मुख्यमंत्री पदाची सुत्र हातात घेतल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रथमच अयोध्येला जाणार आहे. सरकारच्या १०० दिवसपूर्तीनिमित्त ते अयोध्येत भेट देणार आहेत. यावेळी शिवसेनेचे सर्व खासदारांना त्यांच्यासोबत अयोध्येला जाणार आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करुन यासंदर्भातील माहिती दिली.
सरकार जोरात कामास लागले आहे. पाच वर्षे पुर्ण करणारच!
प्रभू श्रीरामाची कृपा.
सरकारला शंभर दिवस पुर्ण होताच मुख्यमंत्री ऊदधव ठाकरे अयोध्येस जातील .श्रीरामाचे दर्शन घेऊन पुढील कार्याची दिशा ठरवतील— Sanjay Raut (@rautsanjay61) January 22, 2020
विधानसभा निवडणूक २०१९ काळात तत्कालीन सरकारकडून फोन टॅप करण्यात आले. विधानसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्र सरकारचे काही अधिकारी इस्रायलला गेले होते. त्यांनी तिथून आणलेल्या सॉफ्टवेअरचा वापर करून विरोधकांचे फोन टॅप केल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. याप्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.