मुंबई : विरोधकांच्या संविधान रॅलीला उत्तर देण्यासाठी भाजपची तिरंगा रॅली सुरू केली आहे.
डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करून चैत्यभूमीपासून भाजपच्या तिरंगा यात्रेला सुरुवात झाली आहे. या रॅलीमध्ये भाजपचे मंत्री, आमदार, खासदार सहभागी झाले आहेत. तर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कामगार मैदानावर सभा होणार आहे.
तर तिरंग्याला विरोध करणारे आता संविधान बचाव रॅली काढत आहेत, असा आरोप विरोधकांनी केला आहे. तर विरोधक हे केवळ आपली मतं वाचवण्यासाठी संविधान रॅली काढत असल्याचं मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार म्हटलं आहे. संविधानाच्या सन्मानासाठी आम्ही तिरंगा रॅली काढली आहे, असेही ते म्हणाले.