Mumbai Ayodhya Special Train: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रामलल्लाचे दर्शन मोहीम हातात घेतली आहे. रामभक्तांसाठी 6 मतदारसंघातून 6 विशेष ट्रेन धावणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिरात मूर्तीची प्राणप्रतिष्ठा मोठ्या थाट्यामाट्यात संपन्न झाली. देशभरामध्ये सर्वत्र उत्सवाचे आणि आनंदाचे वातावरण पाहिला मिळत आहे. प्राण-प्रतिष्ठपणा सोहळा उत्साहात आणि जल्लोषात अख्खा जगाने पाहिला. अयोध्येत तब्बल 500 वर्षांनी नवीन राम मंदिरात श्री रामाची मूर्ती विराजमान झाली आहे. मंदिरात प्रभू रामाच्या बाळ रुपातील मूर्तीची प्राण-प्रतिष्ठा आणि पुजा करण्यात आली आहे. दरम्यान या सोहळ्यानंतर आता भाजपचे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवीन अभियान हातात घेतलं आहे. मतदारांना खूश करण्यासाठी भाजपने रामभक्तांसाठी विशेष ट्रेन सोडणार असल्याचं सांगितल आहे. (Special Train For Ayodhya)
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप मुंबईकरांना अयोध्या दर्शन रामभक्तांना घडविणार आहे. प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी मुंबईच्या 6 लोकसभा मतदारसंघातून 6 विशेष ट्रेन सोडण्यात येणार आहे. हजारो मुंबईकरांना मोफत दर्शन घडवण्यासाठी भाजपनं नियोजन करण्यास सुरुवात केली आहे. मुंबईतून पहिली अयोध्या दर्शन विशेष ट्रेन 5 फेब्रुवारीला धावणार आहे. (BJP strategy Lok Sabha elections special train for ayodhya darshan mumbai 6 constituencies)
'आस्था से अयोध्या स्पेशल ट्रेन'
सीएसएमटी ते अयोध्येपर्यंत एकूण 16 आस्था ते अयोध्या स्पेशल रेल्वे गाड्या धावत आहेत. ही ट्रेन मुंबई सीएसएमटीमधून रात्री 10. 35 वाजता सुटेल आणि सुमारे 34 तास 55 मिनिटं प्रवास केल्यानंतर सकाळी 9.30 वाजता अयोध्या स्थानकावर पोहोचणार आहे. या परतीच्या प्रवासासाठी ही ट्रेन अयोध्येहून दुपारी 4.40 वाजता सुटेल आणि 12. 40 वाजता मुंबईला परतणार आहे.
आस्था ते अयोध्या विशेष गाड्या
मुंबई ते अयोध्या प्रवासादरम्यान राम भक्तांना जळगावमध्ये नाश्ता मिळणार आहे. त्यानंतर खंडवामध्ये दुपारचे जेवण तर रात्रीचे जेवण भोपाळमध्ये देण्यात येणार आहे. त्याशिवाय दुसऱ्या दिवशी कानपूरमध्ये नाश्ता दिला जाणार आहे. आयआरसीटीसी शुद्ध शाकाहारी जेवण आणि नाश्ता असणार आहे.
हेसुद्धा वाचा - Ram Mandir : रेल्वेने अयोध्येला जाताय? आधी 'ही' बातमी वाचा
मध्य रेल्वेच्या पाचही विभागांतून एकूण 46 आस्था ते अयोध्या विशेष प्रीपेड ट्रेन धावणार आहे. यापैकी 30 गाड्या मुंबई सीएसएमटी ते अयोध्येपर्यंत धावणार आहेत. आस्था से अयोध्या विशेष ट्रेनच्या पूर्ण खर्च भाजप, आरएसएस आणि विश्व हिंदू परिषद करणार आहे.