मुंबई : भाजप आमदार आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे (Bjp Nitesh Rane) यांनी महाविकास आघाडीवर (Mahavikas Aghadi) गंभीर आरोप केला आहे. मला कोल्हापूरमध्ये इंजेक्शन देउन मारण्याचा प्लॅन होता, असा घणाघाती हल्ला नितेश राणे यांनी केला आहे. (bjp mla nitesh rane critisize to maharashtra government in polkhol meeting at mumbai)
"राणा दाम्पत्याला जेलमध्ये अतिशय वाईट वागणूक दिली जात असून आपल्यालाही कोल्हापूरमध्ये इंजेक्शन देऊन मारण्याचा प्लान होता" असा घणाघाती आरोप भाजप आमदार नितेश राणेंनी केला. ते मुंबईतल्या पोलखोल सभेनंतर पत्रकारांशी बोलत होते. यावेळेस त्यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली.
"मोहित कंबोजांवरही हल्ला झाला. आता राणा दाम्पत्याचा छळ सुरूंय असून सरकार सूडाचं राजकारण करत असल्याचा आरोपही नितेश राणांनी केलाय.
खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा या दाम्पत्याला चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे या दोघांना भायखळा आणि तळोजा कारागृहात ठेवण्यात आले आहे.