मुंबईकरांसाठी मोठी घोषणा, एसी लोकल तिकीट दर 'इतक्या' टक्क्यांनी कमी

मुंबईकरांचा प्रवास होणार थंडा थंडा कुल कुल, रेल्वे राज्यमंत्र्यांनी केली मोठी घोषणा

Updated: Apr 29, 2022, 02:08 PM IST
मुंबईकरांसाठी मोठी घोषणा, एसी लोकल तिकीट दर 'इतक्या' टक्क्यांनी कमी title=

मुंबई : मुंबईकर रेल्वे प्रवाशांसाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे. राज्यात उष्णतेची लाट (Heat wave) कायम असताना आता मोदी सरकारने मुंबईकरांना मोठा दिलासा दिला आहे. उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांचा रेल्वे प्रवास आता गारेगार होणार आहे. एसी लोकलने (AC Local) प्रवास करणं सामान्य मुंबईकरांच्या आवाक्यात आलं आहे. 

मोदी सरकारने (Modi Government) एसी लोकलचे भाडे 50 टक्क्यांनी कमी करण्याचा मोठा निर्णय घेत मुंबईकरांना मोठा दिलासा दिला आहे. मुंबईकरांचा गारेगार एसी लोकलचा प्रवास कमालीचा स्वस्त झालाय. मुंबई एसी लोकलचं भाडं तब्बल 50 टक्क्यांनी कमी करण्यात आलंय. मुंबईत एसी लोकलचं सध्या कमीत कमी भाडं 65 रूपयांऐवजी 30 रूपयांवर आलंय.

रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी ही मोठी घोषणा केलीय.उन्हाळ्याने त्रासलेल्या रेल्वे प्रवाशांना रेल्वे राज्यमंत्र्यांनी मोठा दिलासा दिला आहे.