Anant-Radhika Wedding Video: 'साजिरी गोजिरी जोडी ही..!' अनंत अंबानी-राधिका मर्चंट अखेर अडकले लग्नबंधनात

Anant-Radhika Wedding Unseen Video: अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाह सोहळा अखेर पार पडला. नववधू लूक आणि विवाह सोहळ्याच्या क्षणाचे व्हिडीओ समोर आले आहेत.   

नेहा चौधरी | Updated: Jul 13, 2024, 09:47 AM IST
Anant-Radhika Wedding Video: 'साजिरी गोजिरी जोडी ही..!' अनंत अंबानी-राधिका मर्चंट अखेर अडकले लग्नबंधनात title=
anant ambani radhika merchant wedding ceremony first video and first photo viral

Anant-Radhika Wedding Unseen Video: बहुचर्चित आणि जगातील सर्वात गँण्ड वेडिंग अनंत अबांनी आणि राधिका मर्चंट यांचा विवाह अखेर पार पडला. मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये शुक्रवारी 12 जुलैला हा विवाह सोहळा रंगला. या सोहळ्याला बॉलिवूड, हॉलिवूड, राजकीय नेत्यांपासून खेळ जगतसह जगताली मान्यवर उपस्थितीत होते. 

या लग्नाचे असंख्य व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. नवरदेव अनंत अंबानी शेरवानी आणि फेट्यामध्ये उठून दिसत होता. तर नववधू राधिकाचा लूक आणि तिची एन्ट्री अतिशय सुंदर होती. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ambani Family (@ambani_update)

वडील मुकेश अंबानी आणि काका अनिल अंबानीसह वर अनंत अंबानीने लग्न मंडपात एन्ट्री घेतली. त्यावेळी बाजूला उभे असलेले उद्धव ठाकरेंना अनंत अंबानी जाऊन भेटले. 

 

तर राधिका मर्चंट हिची एन्ट्री खूप आकर्षिक आणि लक्षवेधी होती. मोराच्या आकाराच्या बोटीतून नववधू लग्न मंडपात आली. यावेळी गायिका श्रेया श्रेया घोषाल हिने खास गाण म्हटलं. 

 

दरम्यान सोनू निगम, हरिहरन, श्रेया घोषाल आणि शंकर महादेवन यांनी लग्नाच्या विधीदरम्यान गाणी गायली, तर अजय-अतुल यांनी संगीताच्या सहाय्याने लग्नगाठ बांधण्यात आली. 

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांनी त्यांच्या शाही विवाह सोहळ्यात एक खास नवस केला. दोघांनीही अग्नी, आई-वडील आणि पाहुण्यांसमोर एकमेकांना वचन दिले. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

राधिका तिच्या पती अनंतला वचन देते म्हणाली, 'आपले घर फक्त एक जागा नसून ती आपल्यातील प्रेमाची आणि एकत्रतेची भावना असेल आणि आपण जिथे आहोत तिथं आपल घर असेल.'

त्यानंतर अनंत अंबानीनेही राधिकाला वचन दिलं. 

'राधिका, श्रीकृष्णाच्या आशीर्वादाने मी वचन देतो की आपण मिळून आपल्या स्वप्नांचे घर बनवू, आपले घर फक्त एक जागा नसणार ती प्रेमाची भावना असेल, आपण कुठेही असलो तरीही.

राधिका आणि अनंतचा एकमेकांना पुष्पहार घालण्याचा पहिला फोटो समोर आला आहे, जो सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे.