देवेंद्र-अजित यांनी करून दाखवलं - अमृता फडणवीस

 देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. 

Updated: Nov 23, 2019, 06:33 PM IST
देवेंद्र-अजित यांनी करून दाखवलं - अमृता फडणवीस title=

मुंबई : मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. आज सकाळी ८ वाजता देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यानंतर अमृता फडणवीस यांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना शुभेच्छा दिल्या आहेत. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. 

देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांचे अभिनंदन, तुम्ही करून दाखवलं असं ट्विट अमृता फडणवीस यांनी केलं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात आजवर कधीही घडली नाही, अशी घटना आज अचानकपणे पाहायला मिळाली. राज्यात राष्ट्रपती राजवट सुरू असताना देवेंद्र फडणवीस - अजित पवार सरकारचा शपथविधी पार पडलाय. 

'नरेंद्र मोदी, अमित शाह यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राची सेवा करण्याची संधी दिली. खरंतर महाराष्ट्राच्या जनतेनं स्पष्ट जनादेश दिला होता. परंतु, शिवसेनेनं इतर पक्षांसोबत जाण्याचा प्रयत्न केला. जे सरकार चालू शकत नाही असं सरकार देण्याचा प्रयत्न केला गेला. खरं वचन हे आम्ही जनतेला दिलं होतं... शिवसेनेकडून वचनाचा भंग झाला. त्यामुळे महाराष्ट्राच्या हिताकरता आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला' असं मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.