Mumbai University: आत्ताची सर्वात मोठी बातमी, मुंबई विद्यापिठाच्या सर्व परीक्षा स्थगित, कारण आलं समोर!

Mumbai University : स्थगित केलेल्या सर्व परीक्षेचे सुधारित वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रदर्शित करण्यात येईल, असं विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. प्रसाद कारंडे यांनी सांगितलं आहे. 

Updated: Feb 2, 2023, 07:03 PM IST
Mumbai University: आत्ताची सर्वात मोठी बातमी, मुंबई विद्यापिठाच्या सर्व परीक्षा स्थगित, कारण आलं समोर! title=
Mumbai University

Mumbai News: मुंबई विद्यापीठाच्या (Mumbai University) 3 फेब्रुवारी पासूनच्या सर्व परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत. अकृषी विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या परीक्षेच्या कामकाजावरील बहिष्काराच्या आंदोलनामुळे मुंबई विद्यापीठाच्या शुक्रवार दिनांक ३ फेब्रुवारी २०२३ पासूनच्या सर्व परीक्षा (Mumbai University Exam) स्थगित करण्यात आल्या आहेत. स्थगित केलेल्या सर्व परीक्षेचे सुधारित वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रदर्शित करण्यात येईल, असं विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. प्रसाद कारंडे यांनी सांगितलं आहे. (All the exams of Mumbai University have been cancelled Information given by Prasad Karande mumbai news)

मुंबई विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०२२-२३ च्या हिवाळी सत्राच्या विविध विद्याशाखेच्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा विविध केंद्रावर सुरू आहेत. अकृषी विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्यापीठीय व महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समितीने दिनांक २ फेब्रुवारी २०२३ पासून परीक्षेच्या कामकाजावर बहिष्कार टाकण्यात आलाय.

आणखी वाचा - आताची मोठी बातमी! मुंबईकरांसाठी 'कडू' बातमी, पालिकेच्या अहवालात धक्कादायक माहिती समोर

आंदोलनामुळे परीक्षेच्या कामकाजामध्ये अडचणी निर्माण झाल्याने मुंबई विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या सर्व परीक्षा शुक्रवार दिनांक ३ फेब्रुवारी २०२३ पासून स्थगित (Exam Postponed) करण्यात आल्या आहेत. स्थगित केलेल्या सर्व परीक्षेचे सुधारित वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रदर्शित करण्यात येईल, असं मुंबई विद्यापीठच्या जनसंपर्क विभागाने (Department of Public Relations, University of Mumbai) सांगितलं आहे.

दरम्यान, अकृषी विद्यापीठ आणि महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या कधी मान्य होणार?, असा सवाल उपस्थित केला जात आहे. २ फेब्रुवारी २०२३ रोजी मुंबई विद्यापीठाच्या १० परीक्षा सुरळीत पार पडल्या. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर याचा परिणाम होणार असल्याचं म्हटलं जात आहे.