Republic Day ला दमदार भाषण करणाऱ्या 'त्या' चिमुरड्याच्या मदतीसाठी Eknath Shinde यांची धाव, आदेश देत म्हणाले...

प्रजासत्ताक दिनी आपल्या दमदार भाषणाने संपूर्ण महाराष्ट्राला दखल घेण्यास भाग पाडणारा चिमुरडा कार्तिक वजीर यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भेट घेतली आहे. यावेळी त्यांनी त्याच्या उपचाराचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षामार्फत मुंबईतील सर्वोतम उपचार केले जातील असं एकनाथ शिंदेंनी सांगितलं आहे.   

Updated: Feb 2, 2023, 04:49 PM IST
Republic Day ला दमदार भाषण करणाऱ्या 'त्या' चिमुरड्याच्या मदतीसाठी Eknath Shinde यांची धाव, आदेश देत म्हणाले... title=

Republic Day Viral Video: संपूर्ण देशात प्रजासत्ताक दिन (Republic Day) साजरा होत असताना महाराष्ट्रातील एका चिमुरड्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला होता. शाळेच्या पटांगणात अगदी निरागस भावनेने मुलाने केलेलं हे भाषण अनेकांना भावलं. अनेकांच्या चेहऱ्यावर हसू आणणाऱ्या या भाषणाची दखल फक्त सर्वसामान्यच नाही तर थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनीही घेतली आहे. एकनाथ शिंदे यांनी हा चिमुरडा कार्तिक वजीर (Kartik Vajir) याची भेट घेतली आहे. ट्वीट करत त्यांनीच याची माहिती दिली आहे. 

ट्वीटमध्ये काय म्हटलं आहे?

"प्रजासत्ताकदिनी लोकशाही या विषयावर शाळेत केलेल्या अनोख्या भाषणामुळे प्रसिद्ध झालेला जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील रेवलगाव येथील जिल्हा परिषद शाळेत शिकणारा विद्यार्थी चिरंजीव कार्तिक वजीर उर्फ भोऱ्याची आज वाटूर येथे भेट घेतली. याप्रसंगी कार्तिक याच्या लोकशाही विषयावरील भाषणाकरिता अभिनंदन करित त्याचे मनापासून कौतुक केले," अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. 

उपचाराची घेतली जबाबदारी

एकनाथ शिंदे यांनी यावेळी कार्तिकच्या उपचारासाठी आदेश दिला आहे. "भेटीमध्ये कार्तिकला दूरदृष्टीचा दोष आहे असे त्याच्या वडिलांनी सांगितले. त्याच्या डोळ्यांवरील उपचाराची सर्व जबाबदारी मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षामार्फत घेण्यात आल्याचे यासमयी जाहीर केले," असं एकनाथ शिंदेंनी सांगितलं आहे. 

Republic Day 2023 : लोकशाहीवर बिनधास्त भाषण देऊन सगळ्यांना हसवणाऱ्या लहान मुलाची खरी कहाणी डोळ्यात पाणी आणणारी

"लवकरात लवकर चिरंजीव कार्तिक याला ज्येष्ठ नेत्र चिकित्सक पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने यांच्याकडे नेत्र तपासणीसाठी मुंबईत आणण्यात येणार असून त्याच्यावर मुंबईतील सर्वोत्तम रुग्णालयामध्ये उत्तमोत्तम उपचार करण्यात येणार आहे," असं एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं. 

कार्तिकची घऱची स्थिती हालाखीची

कार्तिकचे वडील शेतकरी असून त्याच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. कार्तिक हा दूरदृष्टीच्या आजाराने त्रस्त आहे. त्यामुळे शिक्षक त्याला शाळेत फळयासमोर बसवतात. प्रजासत्ताक दिनी विद्यार्थ्यांनी भाषण स्पर्धेत भाग घेतला असता त्याने मलाही घ्या असा हट्ट धरला होता. शिक्षकांनी त्याला भाषणासाठी 'लोकशाही' हा विषय दिला आणि त्याची तयारीही करून घेण्यात आली. यानंतर त्याने केलेल्या भाषणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला.