अजित पवारांना मोठा धक्का, जयंत पाटील यांनाच व्हिप बजवण्याचा अधिकार

अजित पवार यांना व्हिप बजावणाच्या अधिकार नसल्याचे उघड झाले आहे.  

Updated: Nov 26, 2019, 09:40 AM IST
अजित पवारांना मोठा धक्का, जयंत पाटील यांनाच व्हिप बजवण्याचा अधिकार title=

मुंबई : अजित पवार यांना व्हिप बजावणाच्या अधिकार नसल्याचे उघड झाले आहे. कारण विधीमंडळाच्या सचिवालयातील कार्यालयीन नोंदीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते म्हणून जयंत पाटील यांच्या नावाची नोंद आहे. त्यामुळे त्यांना व्हिप बजावण्याचा अधिकार असल्याची माहिती सचिवालयातील अधिकाऱ्याने दिली आहे. ३० ऑक्टोबरला अजित पवारांची विधीमंडळ पक्षनेतेपदी निवड झाली. ही माहिती मीडियातून मिळाली. मात्र, त्याबाबत विधिमंडळाच्या सचिवालयाशी कोणताही पत्रव्यवहार झालेला नसल्याचेही अधिकाऱ्याने सांगितले. तर अजित पवारांना हटवून जयंत पाटल यांची विधीमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आल्याचे पत्र राष्ट्रवादीने सचिवालयाला दिले असून तशी नोंदही करण्यात आली आहे. 

दरम्यान, भाजपच्या काही नेत्यांकडून वारंवार सांगितले जात आहे. आमच्यासोबत राष्ट्रवादीचे ५४ आमदार आहेत. अजित पवार हे गटनेते म्हणून निवडले गेले आहेत. त्यांनाच पक्षाचा व्हिप बजवाण्याचा अधिकार आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या आमदार अजित पवारांच्या बाजुने आपला हक्क बजावतील. मात्र, नव्या माहितीनुसार अजित पवार हे विधीमंडळ नेते नसल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे भाजपकडून करण्यात येणारा दावा फोल ठरला आहे. तसेच अजित पवार यांना आता कोणतेही अधिकार नसल्याने ते व्हिप बजावू शकत नाहीत. राष्ट्रवादीचे अधिकृत विधिमंडळ नेते हे जयंत पाटील आहेत, हे विधिमंडळाच्या सचिवालयात लेखी नोंद असल्याने त्यांनाच व्हिपचा अधिकार राहणार आहे. त्यामुळे अजित पवार आणि भाजपच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे.

तर दुसरीकडे महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालय आज सकाळी १०.३० वाजता निकाल देणार आहे. देवेंद्र फडणवीस सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी किती वेळ द्यायचा यासंदर्भात न्यायालय आदेश देईल. सोमवारी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद न्या. एन. व्ही. रमण, न्या. अशोक भूषण आणि न्या. संजीव खन्ना यांनी ऐकला. मात्र निकाल राखून ठेवण्यात आला. आता आज त्यावर निर्णय देण्यात येईल. सर्वोच्च न्यायालयच्या निर्णयाकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले. तिकडे महाविकासआघाडीने सोमवारी शक्तिपरीक्षेची रंगीत तालीम घेतली. 

शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीने १६२ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र राज्यपालांना सादर केले. त्यानंतर आमदारांना संध्याकाळी मुंबईतील ग्रँड हयात या पंचतारांकित हॉटेलात एकजुटीची शपथ देण्यात आली. दरम्यान अजित पवारांना व्हिप बजावणाच्या अधिकार नसल्याचे उघड झाले. कारण विधीमंडळाच्या सचिवालयातील रेकॉर्डवर राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते म्हणून जयंत पाटील यांच्या नावाची नोंद आहे. त्यामुळे आता नेमकं राज्याच्या राजकारणात काय घडणार याबद्दल उत्सुकता लागली.

जयंत पाटील राष्ट्रवादीचे गटनेते अधिकृत

- विधिमंडळाच्या दृष्टीने जयंत पाटील राष्ट्रवादीचे गटनेते आहेत.
- त्यामुळे व्हिप काढण्याचा अधिकार जयंत पाटील यांना राहतो
- अजित पवारांची गटनेतेपदी नियुक्ती झाल्याची माहिती राष्ट्रवादीने विधिमंडळाला दिली नव्हती
- तर जयंत पाटील यांची गटनेतेपदी नियुक्ती झाल्याची माहिती राष्ट्रवादीने कालच विधिमंडळाला दिली आहे
- त्यामुळे विधिमंडळाच्या दृष्टीने जयंत पाटील हेच राष्ट्रवादीचे गटनेते असून विधिमंडळ कामकाजाबाबत पक्षाच्या आमदारांना व्हिप काढण्याचे अधिकार जयंत पाटील यांनाच आहेत