आदित्य ठाकरे लढविणार लोकसभा निवडणूक?

शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी ईशान्य मुंबईतून लोकसभा निवडणूक रिंगणात....

Updated: Jun 13, 2018, 10:21 PM IST
आदित्य ठाकरे लढविणार लोकसभा निवडणूक? title=

मुंबई : शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी ईशान्य मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवावी, अशी तमाम शिवसैनिकांची इच्छा आहे असं सूचक विधान शिवसेना नेत्या आणि प्रवक्त्या आमदार नीलम गोऱ्हे यांनी केलंय. याबाबत अंतिम निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेतील असंही त्या म्हणाल्यात. 

आदित्य यांनी ही निवडणूक लढवल्यास त्यांच्यासमोर भाजप खासदार किरीट सोमय्यांचं आव्हान असेल. हाच धागा पकडून गोऱ्हे यांनी सोमय्यांना टोला लगावलाय.