Maharashtra Political News : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा धमाका पाहायला मिळणार आहे. शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर ठाकरे गट (Thackeray Group) आणि शिंदे गट (Shinde Group) असे दोन गट पडलेत. (Latest Political News in Marathi) आता शिंदे गट ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के देत आहे. पुन्हा एकदा राजकीय नेत्यांची पळवापळवी दिसून येत आहे. आता तर शिवसेना चित्रपट शिवसेनेचे कार्याध्यक्ष आणि आमदार तसेच नगरसवेक शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे. हा ठाकरे गटासाठी मोठा झटका मानला जात आहे. (Maharashtra Political News Updates)
अभिनेता सुशांत शेलार शिंदे (Actor Sushant Shelar ) गटात प्रवेश करणार आहे. शेलार यांच्याकडे शिवसेना चित्रपट सेनेचं कार्याध्यक्ष पद होतं. एकनाथ शिंदे यांच्या धडाकेबाज कार्यपद्धतीमुळे सुशांत शेलार शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. यामुंळं हा आदित्य ठाकरे यांना मोठा धक्का मानला जातोय.
मुंबईत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात पुन्हा खिंडार पडण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाचे आमदार प्रकाश फातर्पेकर आणि माजी नगरसेवक अनिल पाटणकर यांनी महाविकास आघाडीच्या मोर्चाकडे पाठ फिरवली होती. महाविकास आघाडीच्या मोर्चात सहभागी न होता, ते दोघे बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे लोकसभा गटनेते खासदार राहुल शेवाळे यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. त्यामुळे दे दोघे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. या दोघांनी शिंदे गटात प्रवेश केला तर तो ठाकरे गटासाठी मोठा धक्का असेल.