महाराष्ट्राबाहेरच्या जेलमध्ये पाठवण्याची अबू सालेमने केली मागणी

न्यायालयाचा निकाल येताच महाराष्ट्राबाहेरच्या जेलमध्ये पाठवा अशी मागणी अबू सालेमने केली.

Updated: Sep 7, 2017, 03:48 PM IST
महाराष्ट्राबाहेरच्या जेलमध्ये पाठवण्याची अबू सालेमने केली मागणी title=

मुंबई : १९९३ मुंबई बॉम्बस्फोटप्रकरणी विशेष टाडा न्यायालयाने अबू सालेमला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. न्यायालयाचा निकाल येताच महाराष्ट्राबाहेरच्या जेलमध्ये पाठवा अशी मागणी अबू सालेमने केली. महाराष्ट्रातील जेलमध्ये जीवाला धोका असल्याचे त्यानं सालेमनं न्यायालयाला सांगितले. त्यामुळे उत्तर प्रदेशमधील जेलमध्ये पाठवण्यात यावे अशी मागणी त्याने न्यायालयाकडे केली. मात्र न्यायालयानं ही मागणी फेटाळली आहे. 

1993 स्फोटाप्रकरणी आज विशेष टा़डा कोर्टानं शिक्षा सुनावल्यावर भर कोर्टात एक नाट्यमय प्रसंग घडला. फिरोज खानला विशेष टाडा न्यायाधीश जी ए सानप यांनी फाशीची शिक्षा सुनावली. फिरोजच्या आधी अबू सालेमला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. फिरोजला फाशीची शिक्षा दिल्यावर अबू त्याला भेटीला गेला. आणि फिरोज खानचा संयम सुटल्यानं त्यानं भर कोर्टात अबूला शिविगाळ केली.