१९९३ ब्लास्ट : आठ टन आरडीएक्स घेऊन मुंबईत घुसला टायगर मेमन

केवळ महाराष्ट्रच नव्हे तर, अवघ्या देशाला हादरा देणाऱ्या १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील दोषींना शिक्षा झाली. हा बॉम्बस्फोट जेवढा भयानक होता तितकीच या कटाची तयारीही भयानक होती. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण, हा स्फोट घडवण्यासाठी टायगर मेमन तब्बल ८ टन आरडीएक्स घेऊन मुंबईत आला होता.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Sep 7, 2017, 03:37 PM IST
१९९३ ब्लास्ट : आठ टन आरडीएक्स घेऊन मुंबईत घुसला टायगर मेमन title=

मुंबई : केवळ महाराष्ट्रच नव्हे तर, अवघ्या देशाला हादरा देणाऱ्या १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील दोषींना शिक्षा झाली. हा बॉम्बस्फोट जेवढा भयानक होता तितकीच या कटाची तयारीही भयानक होती. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण, हा स्फोट घडवण्यासाठी टायगर मेमन तब्बल ८ टन आरडीएक्स घेऊन मुंबईत आला होता.

१९९३मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाने राजधानी मुंबई शहर भयकंपीत झाले. कधीही न थांबणाऱ्या, न घाबरणाऱ्या मुंबईवर अशा प्रकारे झालेला हा पहिलाच घातपात होता. हा घातपात करण्यासाठी अत्यंत क्रुरपणे रचण्यात आलेल्या कटाची कहाणी वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल. १९९२ मध्ये बाबरी मशीद पाडण्यात आली. त्यानंतर देशात ठिकठिकाणी दंगली उसळल्या. दरम्यान, याचाच फायदा या बॉम्बस्फोट प्रकरणी शिक्षा ठोठावलेल्या आरोपींनी उचलला. त्यांनी एक व्हिडिओ तयार केला. यात गुजरात दंगलीदरम्यान एका मुस्लिम महिलेवर कशा प्रकारे बलात्कार करण्यात आला याची कहाणी रचण्यात आली होती. हा व्हिडिओ दाखवून अनेकांच्या डोक्यात जिहादच्या नावाखाली कट्टरतेचे विष भरण्यात आले.

दरम्यान, हा कथीत व्हिडिओ पाहून भारतातील काही मुस्लिम युवक पाकिस्तानात पोहोचले. तेथे जाऊन त्यांनी घातपात करणे आणि बॉम्बस्फोट कसा करायचा याचे प्रशिक्षण घेतले. या लोकांना दुबईलाही नेण्यात आले. तेथे जिहादच्या नावाखाली त्यांचे ब्रेन वॉशींग करण्यात आले. या तरूणांना गुजरातमध्ये मुस्लिम महिलांवर झालेल्या बलात्काराचे ते कथीत व्हिडिओ अनेक तास दाखवण्यात आले. हे व्हिडिओ पाहून बदला घेण्याच्या भावनेने प्रेरीत झालेल्या त्या तरूणांवर मुंबईत बॉम्बस्फोट करण्याची जबाबदारी देण्यात आली.

नेमकी हीच जबाबदारी पार पाडण्यासाठी टायगर मेमन हा आयएसआयच्या मदतीने थोडेथोडके नव्हे तर, तब्बल ८ टन आरडीएक्स घेऊन मुंबईत पोहोचला होता. यात कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम मुख्य म्होरक्या होता. तर, टायगर मेमन आणि मुस्तफा डोसा या तरूणांना प्रोत्साहन देत होते. एस हुसेन झैदी यांनी आपल्या 'माय नेम इज अबू सालेम' या पूस्तकात याचा सविस्तर उल्लेख केला आहे.