आदित्य ठाकरेंची नेतेपदी निवड, शिवसैनिकांनी फोडले फटाके

आज सुरु असलेल्या शिवसेनेच्या कार्यकारिणी बैठकीत युवा सेनाप्रमुख यांना बढती मिळाल्याचं जाहीर करण्यात आलंय. 

Updated: Jan 23, 2018, 01:50 PM IST
आदित्य ठाकरेंची नेतेपदी निवड, शिवसैनिकांनी फोडले फटाके title=

मुंबई : आज सुरु असलेल्या शिवसेनेच्या कार्यकारिणी बैठकीत युवा सेनाप्रमुख यांना बढती मिळाल्याचं जाहीर करण्यात आलंय. 

उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांची शिवसेनेच्या नेतेपदी निवड करण्यात आलीय. शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत मंत्री गुलाबराव पाटील यांनी ही घोषणा केली. आदित्य ठाकरेंची नेतेपदी घोषणा होताच, शिवसैनिकांनी फटाके फोडत जल्लोष केला... 

तर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची पक्षप्रमुख म्हणून फेरनिवड करण्यात आलीय. निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे उद्धव ठाकरे यांची पक्षप्रमुख म्हणून फेरनिवड होणं गरजेचं होतं. 

शिवसेनेच्या या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला शिवसेनेचे सगळे नेते उपस्थित होते.