नवी दिल्ली : सुशांत सिंह राजपूत लवकरच एका डाकूच्या भूमिकेत दिसणार आहे. इतकंच नाही तर त्याच्या या आगामी चित्रपटात भूमी पेडणेकर देखील आहे. खरंतर 'इश्किया', 'डेढ़ इश्किया' आणि 'उड़ता पंजाब' यांसारखे हिट चित्रपटाचे डिरेक्टर आपल्या आगामी चित्रपट चंबल या डाकूवर बनवत आहेत. मीडियाने दिलेल्या वृत्तानुसार या चित्रपटात भूमी आणि सुशांत रोमान्स करताना दिसतील. सुरुवातील हा चित्रपट या वर्षाच्या शेवटी प्रदर्शित होणार होता. परंतु, आता या चित्रपटाचे शूटिंग या वर्षाच्या शेवटी सुरु केले जाईल. त्यानंतर २०१८ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होईल.
यापूर्वी देखील डाकूंच्या जीवनावर चित्रपट बनले होते:
'मेरा गावं मेरा देश', 'जिस देश में गंगा बहती है', 'मदर इंडिया', 'शोले', 'चाइना गेट', 'मेला' हे सगळे चित्रपट डाकूंच्या जीवनावर आधारीत होते. परंतु, सुशांत डाकूच्या भूमिकेत कसे दिसतील, याची उत्सुकता सगळ्यांना आहे. सुशांतकडून फॅन्सच्या खूप अपेक्षा आहेत. अलीकडेच प्रदर्शित झालेला 'राब्ता' हा चित्रपट विशेष चालला नाही. म्हणून सुशांतसाठी देखील हा चित्रपट महत्त्वपूर्ण आहे.
सध्या सुशांत ‘चंदा मामा दूर के’ या चित्रपटाच्या ट्रेनिंगमध्ये व्यस्त आहे. सायन्स फ्रिक्शन असलेल्या अवकाशावर आधारीत चित्रपटात सुशांत अंतराळवीराच्या भूमिकेत आहे. त्यासाठी त्यांना विशेष ट्रेनिंग दिली जात आहे. वृत्तानुसार या चित्रपटात सुशांत व्यतिरिक्त नवाजुद्दीन सिद्दीकी आणि आर. माधवन देखील आहे. चित्रपटात सुशांत अंतराळवीर तर माधवन टेस्ट पायलेट च्या भूमिकेत दिसेल. त्याचबरोबर भूमी पेडणेकर देखील 'टॉयलेट-एक प्रेम कथा' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.