येस बँकेतील घोळामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफीचे पैसे मिळण्यात अडचण

अनेक छोटय़ा बँका येस बँकेकडून आयएफएससी कोड सुविधा घेतात. त्यामुळे एका बँकेकडून दुसऱ्या बँकेकडे पैसे पाठवण्यातही बँकांना अडचणी येत आहेत. 

Updated: Mar 8, 2020, 11:39 AM IST
येस बँकेतील घोळामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफीचे पैसे मिळण्यात अडचण title=

मुंबई: येस बँकेवरील (Yes Bank) रिझर्व्ह बँकेच्या निर्बंधांमुळे राज्यातल्या बँकिंग व्यवहारांवर परिणाम झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या अनेक सहकारी, जिल्हा मध्यवर्ती बँका यासंबंधीची सेवा येस बँकेकडून घेतात. त्याचा परिणाम म्हणून सहकारी बँकांचे आरटीजीएस, एनईएफटी, धनादेश वटवणे असे ऑनलाईन व्यवहार ठप्प झालेले पाहायला मिळत आहेत. येस बॅकेवरील रिझर्व बॅकेच्या निर्बंधामुळे राज्यातल्या बँकींग व्यवहारावर परिणाम होताना दिसत आहे.

राज्यातील ७५ ते १०० सहकारी बँकांच्या ठेवी येस बँकेत असून बँकेवरील निर्बंधांमुळे हे पैसे अडकले आहेत. राज्य शासनाच्या कर्जमाफी योजनेतील पैसेही येस बँकेत अडकल्याने हे पैसे शेतकऱ्यांना देण्यातही अडचण येत आहे. अनेक छोटय़ा बँका येस बँकेकडून आयएफएससी कोड सुविधा घेतात. त्यामुळे एका बँकेकडून दुसऱ्या बँकेकडे पैसे पाठवण्यातही बँकांना अडचणी येत आहेत. 

येस बँकेच्या ग्राहकांना दिलासा; ATM सेवा पूर्ववत

येस बँकेशी संलग्नित चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, आनंद नागरी बँक, भंडारा अर्बन, अकोला अर्बन या बँकांचे धनादेश एलआयसी आणि नॅशनल इन्शुरन्सने स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला आहे. या सर्व बँकांचे धनादेश क्लिअरिंग, आरटीजीएस आदी सेवा दोन दिवसांपासून बंद आहेत.

तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या येस बँकेत १९१ कोटींच्या ठेवी, पेच निर्माण

दरम्यान स्टेट बॅकेकडून २४५० कोटीची गुंतवणूक करण्यात आली आहे. आरबीआयने फेररचना योजनेची घोषणा केली आहे. त्यामुळे येस बँकेऐवजी दुसऱ्या मोठय़ा बँकेकडून सेवा घेणे सहकारी बँकांना शक्य आहे. येत्या तीन दिवसांत सर्व सहकारी बँकांचे व्यवहार सुरू होतील. दोन-तीन दिवस त्रास होईल, मात्र कोणत्याही खातेदार आणि ठेवीदाराच्या पैशांना धक्का लागणार नाही, असे मत जाणकार व्यक्त करीत आहेत.