'लोकप्रियता मिळाल्यानंतर ऐश्वर्या बदलली'; सोना मोहपात्रचा मोठा खुलासा

Sona Mohapatra on Aishwarya Rai : सोना मोहपात्रानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत ऐश्वर्याविषयी हा खुलासा केला आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Dec 29, 2024, 03:05 PM IST
'लोकप्रियता मिळाल्यानंतर ऐश्वर्या बदलली'; सोना मोहपात्रचा मोठा खुलासा  title=
(Photo Credit : Social Media)

Sona Mohapatra on Aishwarya Rai : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय ही फक्त तिच्या सुंदरतेसाठी नाही तर तिच्या अभिनयासाठी देखील ओळखली जाते. मिस वर्ल्ड ते बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींच्या यादीत जागा तिनं स्वत:चं स्थान निर्माण केलं आहे. तिनं अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. दरम्यान, गायिका सोना मोहपात्रानं खुलासा केला की ऐश्वर्याला लोकप्रियता मिळाल्यानंतर तिनं स्वत: ला बदललं आहे. ती आता तिचा हुशारपणा कमी केला आहे. 

सोना मोहपात्रानं 'लव लिंगो' ला ही मुलाखत दिली आहे. तिनं यावेळी सांगितलं की कशा प्रकारे काही कलाकार मुद्दामून इंडस्ट्रीत गेल्यावर त्यांची हुशारपणा दाखवत नाहीत. त्यावेळी बोलताना सोना मोहपात्रानं ऐश्वर्या रायच उदाहरण दिलं आणि सांगितलं की 'ती तेव्हा ऐश्वर्याला भेटली होती जेव्हा ती रचना संसद अकॅडमी ऑफ आर्किटेक्चरमध्ये आर्किटेक्चरचं शिक्षण घेत होती.' 

याविषयी पुढे सोना मोहपात्रानं सांगितलकी 'तेव्हा ऐश्वर्या तिला खूप सुंदर, हुशार आणि मुद्द्याला घेऊन बोलणार वाटली होती. मिस वर्ल्ड स्पर्धा जिंकल्यानंतर आणि लोकप्रियता मिळवल्यानंतर ऐश्वर्याच्या पर्सनॅलिटीमध्ये खूप बदल झाला आहे. ती आर्किटेक्चरचं शिक्षण घेत होती, माझ्याहून वयानं ती मोठी आहे. तिची एक क्लासमेट होती. फॅमिली फ्रेंड होती. खूप जवळची होती. ती खूप सुंदर दिसायची. खूप हुशार होती. कायम खूप छान बोलायची.' 

हेही वाचा : शार्क टँकमधील जज अमन गुप्ताचा बॉलिवूडमधील गर्विष्ठ अभिनेत्याविषयी मोठा खुलासा; रेडिट वापरकर्त्यांनी सांगितलं नाव

पुढे सोना मोहपात्रा म्हणाली की 'जेव्हा तिनं नंतर ऐश्वर्याला पाहिलं तेव्हा तिला पाहून वाटलं नाही की ही तिच मुलगी आहे, जिला ती ओळखायची. इंडस्ट्रीत ऐश्वर्याचं जास्त न बोलणं आणि तिला काही विचार करु न देण्यासाठी इंडस्ट्रीनं तिला भाग पाडलं असेल. असं असू शकतं की कोणत्याही प्रकरणात डिप्लोमॅटिक असेल, पण ती खूप हसाची. असं असू शकतं की तिचा तो एक काळ असेल. पण मी हा विचार करायचे की ती खूप हुशार स्त्री आहे. पण ज्या इंडस्ट्रीमध्ये ती आहे. पण आता तिला तिचा हुशारपणा न वापरण्यास भाग पाडलं आहे. मी चुकीची असू शकते. तिनं आता बोलतानाचा तिचा टोन कमी केला आहे.'