Hingoli Firing: हिंगोलीत पोलीस कर्मचाऱ्याने आपल्या सासरच्यांवर गोळीबार केल्याने एकच खळबळ उडाली आहे. कौटुंबिक वादातून पोलीस कर्मचाऱ्याने अख्ख्या कुटुंबावर गोळ्या झाडल्या. या गोळीबारात पत्नीचा जागीच मृत्यू झाला होता. त्यानंतर आता सासू आणि मेहुण्याचाही मृत्यू झाला आहे. पोलिसांनी आरोपी पोलीस कर्मचाऱ्याला अटक केली आहे. तसंच आपण हे प्रकरण फार संवेदनशीलतेने हाताळत असल्याचं सांगितलं आहे.
हिंगोलीत कौटुंबिक वादातून पत्नीसह सासू, मेहुणा आणि त्याच्या चिमुकल्यावर गोळीबार केल्याची घटना घडली होती. या प्रकारात पत्नीचा जागीच मृत्यू झाला होता. सासू, मेहुणा आणि चिमुकल्यावर नांदेड येथे उपचार सुरू होते, आरोपी पोलीस कर्मचारी विलास मोकाडे या आरोपीचा मेहुणा योगेश धनवे याचा आता मृत्यू झाला आहे. त्यामुळे या गोळीबारातील मृतांची संख्या दोन वर पोहोचली आहे. दरम्यान आरोपी विलास मोकाडे याला पोलिसांनी यापूर्वीच सेवेतून निलंबित केलं आहे, त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक ही करण्यात आली आहे.
सासू आणि त्याच्या 2 वर्षाच्या मुलावर नांदेड येथे उपचार सुरू आहेत. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. दरम्यान हे प्रकरण आम्ही अत्यंत संवेदनशीलपणे हाताळत आहोत अशी प्रतिक्रिया पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिली आहे..