उद्यापासून विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन २४ तास सुरु राहणार

२४ तास खुलं राहणार मंदिर

Updated: Nov 11, 2018, 06:12 PM IST
उद्यापासून विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन २४ तास सुरु राहणार title=

पंढरपूर : कार्तिकी यात्रेनिमित्त पंढरपुरात उद्यापासून विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन २४ तास सुरू असणार आहे. १९ नोव्हेंबर रोजी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा करणार आहेत.

२७ नोव्हेंबरपर्यंत विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी मंदिर २४ तास खुलं असणार आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी सचिन ढोले यांनी ही माहिती दिली.

याआधीही ३१ ऑक्टोबरला कार्तिकी यात्रा सोहळ्या निमित्त ऑनलाइन दर्शन बंद करुन २४ तास दर्शन सुरू करण्याचा निर्णय मंदिर समितीनं घेतला होता. त्यानंतर २५ ऑक्टोबरपासून व्हीआयपी दर्शन पासही बंद करण्यात आले होते.

दिवाळी सुट्टी आणि कार्तिकी यात्रा सोहळ्यानिमित्त पंढरीत येणाऱ्या भाविकांच्या संख्येत वाढ होत असल्याने समितीने हा निर्णय घेतला आहे.