धावत्या बाईकवर मित्र शूट करत होता रील, त्याने वळून कॅमेऱ्यात पाहिलं अन् पुढच्या क्षणी....; मृत्यूचा LIVE VIDEO

धावत्या बाईकवर व्हिडीओ शूट करण्याच्या नादात एका तरुणाने जीव गमावला आहे. धुळे-सोलापूर हायवेवर ही घटना घडली आहे. कॅमेऱ्यात ही संपूर्ण घटना कैद झाली आहे.   

शिवराज यादव | Updated: Jul 6, 2024, 05:59 PM IST
धावत्या बाईकवर मित्र शूट करत होता रील, त्याने वळून कॅमेऱ्यात पाहिलं अन् पुढच्या क्षणी....; मृत्यूचा LIVE VIDEO title=

सध्या सोशल मीडियाचा जमाना असून त्याच्या माध्यमातून प्रसिद्धी आणि पैसे मिळत असल्याने अनेक तरुण-तरुणी त्याच्या आहारी गेले आहेत. आपला एखादा रील व्हायरल व्हावा यासाठी प्रत्येक प्रकारचे प्रयत्न केले जातात. हे करताना अनेकदा आपण मर्यादा ओलांडच जीव धोक्यात घालत आहोत हेदेखील अनेकांच्या लक्षात येत नाही. दरम्यान महाराष्ट्रातील अशीच एक घटना समोर आह, ज्यामधील रीलच्या नादात एका व्यक्तीने जीव गमावला आहे. 

दोन तरुण बाईकवरुन जात असताना मागे बसलेला तरुण व्हिडीओ शूट करत होता. यावेळी चालक तरुणाने मागे वळून पाहिलं आणि घात झाला. बाईक रस्त्याच्या कडेला गेल्याने भीषण अपघात होऊन एकाचा मृत्यू झाला. अपघात इतका भीषण होता की, त्याने घटनास्थळीच जीव गमावला. सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. 

धुळे-सोलापूर हायवेवर ही दुर्घटना घडल्याची माहिती मिळत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओत दिसत आहे की, दोन तरुण बाईकवरुन हायवेवर प्रवास करत होते. यावेळी मागे बसलेला तरुण मोबाईलवर व्हिडीओ शूट करत असतो. यानंतर चालकांचंही व्हिडीओत लक्ष जातं. यावेळी तोदेखील समोरचा रस्ता सोडून कॅमेऱ्याच पाहत बसतो. रस्त्यावरचं लक्ष हटल्याने आपली बाईक रस्ता सोडून जात आहे हे त्याच्या लक्षात येत नाही. काही वेळाने बाईक रस्त्याशेजारी लावण्यात आलेल्या लोखंडी रॉडवर जाऊन आदळते. यानंतरही मोबाईलचा व्हिडीओ ऑनच असल्याने जे काही झालं ते सगळं कॅमेऱ्यात रेकॉर्ड झालं आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत एकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. 

रिलच्या नादात गमावले जीव

काही दिवसांपूर्वी एका तरुणीचा रील शूट करण्याच्या नादात मृत्यू झाला होता. गाडी शिकत असताना ती रील शूट करत होता. पण यावेळी ब्रेक ऐवजी एक्सलेटर दाबल्याने गाडी थेट 300 फूट दरीत कोसळली होती. यामध्ये तरुणीचा मृत्यू झाला होता. तसंच काही दिवसांपूर्वी एका तरुणाने पाण्यात उडी मारुन जीव गमावला. 

पुण्यातील तरुण-तरुणीला तंबी

त्याआधी पुण्यातील एका तरुण-तरुणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ पुणे-बंगळुरु महामार्गाजवळील एका पडीक इमारतीवर शूट करण्यात आला होता. या इमारतीच्या गच्चीवरुन तरुणी तरुणाचा हात धरुन खाली लटकताना दिसत होती. ग्रीप स्ट्रेंथ चेक म्हणजेच हाताची पकड किती घट्ट आहे हे तपासून पाहण्यासाठी स्टंटबाजी करत असल्याची कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आला होता. 

सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी याची गंभीर दखल घेतली. Reel बनवण्यासाठी जीवघेणा स्टंट करणाऱ्या तरुण तरुणीला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं.