महाराष्ट्राचं राजकारण औरंगजेबावरुन थेट अहमदशहा अब्दालीपर्यंत येऊन पोहचलं; उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना पुन्हा डिवचलं

Maharashtra Politics : विधानसभा निवडणुकीआधी महाराष्ट्रातलं राजकारण पुन्हा तापलंय.. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी उद्धव ठाकरेंवर औरंगजेब फॅन क्लबचे नेते असल्याचा आरोप केला होता. त्याला आता उद्धव ठाकरेंनीही पलटवार केलाय.. 

वनिता कांबळे | Updated: Aug 3, 2024, 11:07 PM IST
महाराष्ट्राचं राजकारण औरंगजेबावरुन थेट अहमदशहा अब्दालीपर्यंत येऊन पोहचलं; उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना पुन्हा डिवचलं title=

Uddhav Thackeray Vs Devendra Fadnavis : औरंगजेबावरुन राज्यातलं तापलेलं राजकारण आता थेट अहमदशहा अब्दालीपर्यंत येऊन ठेपल आहे. अहमदशहा अब्दालीचे राजकीय वंशज अमित शहा असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केलाय. तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना पुन्हा डिवचल आहे.

उद्धव ठाकरेंनी फडणवीस आणि अमित शाहांवर विखारी टीका केली. आता फडणवीसांनीही उद्धव ठाकरेंवर जोरदार पलटवार केला आहे.  खरंतर औरंगजेब आणि अब्दालीवरुनच्या या राजकीय वादाला नव्याने सुरुवात झाली ती पुण्यातल्या भाजपच्या मेळाव्यापासून. 21 जुलैला झालेल्या या मेळाव्यात अमित शाहांना उद्धव ठाकरेंना औरंगजेब फॅन क्लबचा नेता म्हटलं होतं. औरंगजेबावरुन पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापलं आहे. यामागे खरं कारण आहे ते आगामी विधानसभा निवडणुका.

उद्धव ठाकरे हिरव्या झेंड्याच्या तालावर नाचले तेव्हा मनापासून दु:ख झाल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेत. अमरावतीमधल्या भाजपच्या शिबीरात फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर ही टीका केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर पलटवार केलाय...पुण्यातील भाषणातून ठाकरेंनी ते औरंगजेब फॅन क्लबचे असल्याचं सिद्ध केल्याची टीका फडणवीसांनी केलीये....तर उद्धव ठाकरे फ्रस्ट्रेशनमध्ये असून त्यांचं डोकं ठिकाणावर नसल्याचीही टीका फडणवीसांनी यावेळी केलीये.

एक तर तू राहशील किंवा मी तरी' हे फडणवीसांना म्हटलो नसल्याचं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलंय...त्याचबरोबर ढेकणांना आव्हान देत नसल्याचं म्हणत पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना डिवचलंय...त्याचबरोबर अब्दालीचे राजकीय वंशज अमित शाह असल्याचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंनी अमित शहांवरही निशाणा साधलाय...पुण्यातील शिवसंकल्प मेळ्याव्यात उद्धव ठाकरेंनी भाजपवर चौफेर टीका केलीये ज्यांना लढण्याची इच्छा आहे त्यांनी मैदानात या...तीन महिन्यांत सत्ता आणून दाखवतो...उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कार्यकर्त्यांना आवाहन केलंय...अमरावतीमध्ये भाजपच्या मेळाव्यात ते बोलत होते...