अकोल्यात दोघांच्या हत्या, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर

महानगर असुरक्षित असल्याचं सतत समोर येत असतानाच अकोल्यासारख्या शहरातही कायदा सुव्यवस्था कुठे आहे, असा मुद्दा चर्चेला आलाय.  २४ तासांत दोन हत्या अकोल्यात झाल्या आहेत. 

Updated: Dec 15, 2017, 02:14 PM IST
अकोल्यात दोघांच्या हत्या, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर title=

अकोला : महानगर असुरक्षित असल्याचं सतत समोर येत असतानाच अकोल्यासारख्या शहरातही कायदा सुव्यवस्था कुठे आहे, असा मुद्दा चर्चेला आलाय.  २४ तासांत दोन हत्या अकोल्यात झाल्या आहेत. 

चाकूनं भोसकून केली हत्या 

गुरूवारी रात्री प्रशांत निंघोट या युवकाची हत्या करण्यात आली. चार ते पाच मारेक-यांनी चाकूनं भोसकून निंघोटची हत्या केली. जिल्हा रुग्णालयात प्रशांतचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 

हत्येमागचं कारण अस्पष्ट

प्रशांतच्या हत्येमागचं कारण अजून कऴू शकलं नाही. याप्रकरणी अद्याप कोणाला ताब्यात घेण्यात आलेलं नाही. तर बुधवारी रात्रीही अकोल्यातल्या जुने शहर भागात शैलेश आढाव या युवकाचीही हत्या करण्यात आलीय. 

 १३ जणांना अटक 

जमीन अतिक्रमणाच्या जुन्या वादातून रात्री या भागात नवले-नागलकर गटाच्या वादात ही हत्या करण्यात आली. या प्रकरणी शिवसेना नगरसेविकेचा पती अश्विन नवलेसह दोन्ही गटाच्या १३ जणांना अटक करण्यात आलीय.