मुंबईतील दोन तरुण धरणात बुडालेत

 जिल्ह्यातील नेरळच्या पालीभूत गावातील धरणात मुंबईतील दोन तरुणांचा बुडून मृत्यू झालाय. या धरणावर काहीजण फिरायला आले होते.

Updated: Nov 5, 2017, 08:20 PM IST
मुंबईतील दोन तरुण धरणात बुडालेत title=

रायगड : जिल्ह्यातील नेरळच्या पालीभूत गावातील धरणात मुंबईतील दोन तरुणांचा बुडून मृत्यू झालाय. या धरणावर काहीजण फिरायला आले होते.

यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने पाय घसरून एकजण बुडाला. त्याला वाचवण्यासाठी दुस-याने पाण्यात उडी मारली. मात्र, यात दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला.

प्रसाद तावडे आणि अभिषेक जैन अशी मृतांची नावं आहेत. खोपोलीच्या रेस्क्यू टीमने मृतदेह बाहेर काढले आले आहेत. पोलीस पुढील तपास करत आहेत.