Sparkle Gun Blast Viral Video : आजकाल लग्नाबद्दल (Wedding video) नवीन ट्रेंड (Social media trend) आला आहे, असं म्हणायला हरकत नाही. आपलं लग्न इतरांपेक्षा कसं हटके होईल आणि अविस्मरणीय होईल हे बघत आहे. त्यात सोशल मीडियाचा जगात वावरताना आपल्या लग्नातील फोटो आणि व्हिडीओ किंवा आपण कसे प्रसिद्ध होऊ, व्हायरल होईल, ते पाहत असतात. मग एकशे एक भन्नाट आयडिया शोधल्या जातात. (Social media Viral Video)
कधी बुलेटवरून एन्ट्री किंवा लग्नातील हटके थीम, तर कधी कधी या लग्नात नको ते स्टंट केले जातात. त्यामुळे होत्याचं नव्हतं होतं. सोशल मीडियावर लग्नातील वधू वराचे अनेक व्हिडीओ रोज व्हायरल होतं असतात. त्यातील काही मजेदार असतात तर काही आश्चर्यकारक असतात. काही व्हिडीओ पाहून मनं अगदी प्रसन्न होतं.
पण सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ ते त्या नवरीसाठी आयुष्यभराची शिकवण देऊन गेलं आहे. सोशल मीडियावर स्टंटबाजी करतानाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होतं असतात. एका लग्नात नवरीने लग्न मंडपात वर आणि वधू स्पार्कल गनसोबत जे काही स्टंटबाजी केली त्यानंतर एका क्षणात आनंदाचं वातावरण दु:खात बदलं. (Bride Fire Gun Video)
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे. वधू आणि वर यांच्या चेहऱ्यावरही आनंद दिसून येतं आहे. लग्नातील ठरलेला कार्यक्रम म्हणजे वधू वराचे फोटोसेशन...याही वधू वराने स्पार्कल गनसोबत पोज देऊन फोटो काढण्यास पोज दिली. अन् क्षणात सगळं चित्रच बदलं. वधूच्या हातातील गनचा अचानक स्फोट झाला. (trending video Bride Viral Video handheld fireworks gun Blast wedding explosion brides face viral video on Social media)
वधूने गन फेकून दिली आणि ती वेदनेने किंचाळाला लागली. हा धक्कादायक घटनेनंतर मंडपातील वऱ्हाड्यांनी वधूकडे धाव घेतली. हटके काही तरी करण्याचा नाद वधूचा जीवावर बेतली. या वधूला ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिच्या चेहऱ्याला या स्फोटाने जखम झाल्याचं बोलं जातं आहे.
Idk what's wrong with people these days they are treating wedding days more like parties and this is how they ruin their perfect day. pic.twitter.com/5o626gUTxY
— Aditi. (@Sassy_Soul_) March 31, 2023
हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील @Sassy_Soul_ नावाच्या एका युजरने शेअर केला आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. दरम्यान हा व्हिडीओ महाराष्ट्रातील (Maharashtra News) असल्याचं बोलं जातं आहे. पण अद्याप या बाबत कुठलही स्पष्टीकरण आलेलं नाही.