मुंबई - गोवा महामार्गावर वृक्ष कोसळ्याने वाहतूक ठप्प

मुंबई गोवा महामार्गावर वटवृक्ष कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प पडली. त्यामुळे दोन्ही बाजुने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. दरम्यान, वडाचे झाड हटविण्याचा प्रयत्न सुरु आहे.

Updated: Jun 23, 2017, 04:55 PM IST
 मुंबई - गोवा महामार्गावर वृक्ष कोसळ्याने वाहतूक ठप्प  title=
छाया- प्रफुल्ल पवार

अलिबाग : मुंबई गोवा महामार्गावर वटवृक्ष कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प पडली. त्यामुळे दोन्ही बाजुने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. दरम्यान, वडाचे झाड हटविण्याचा प्रयत्न सुरु आहे.

रायगडमधील पोलादपूरमध्ये लोहारे गावाजवळ ही घटना घडली. रस्त्याच्या मधोमध वडाचे झाड कोसळल्याने दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली. महाड आणि पोलादपूर बाजूला वाहनांच्या रांगाच रांगा पाहायला मिळत आहेत. ग्रामस्थांच्या मदतीने झाड बाजूला प्रयत्न करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.