Crime News: फितूर बायको... पतीच्या खुन्याविरुद्ध फिरवली साक्ष; जाणून घ्या काय आहे प्रकरण?

मूळ फिर्यादी वर्दीदार फितूर होवून आरोपी पक्षाशी संगनमत करुन जबाब दिले. त्यामुळे सरकार पक्षातर्फे  जिल्हा सरकारी वकील  रियाज एस. जमादार यांनी फितूर फिर्यादीची कौशल्यपूर्वक उलट तपास घेतला. यानंतर साक्ष फिरवणाऱ्यांवर कारवाई करण्यात आलेय. 

Updated: Mar 9, 2023, 11:59 PM IST
Crime News:  फितूर बायको... पतीच्या खुन्याविरुद्ध फिरवली साक्ष; जाणून घ्या काय आहे प्रकरण? title=

रविंद्र कांबळे, झी मीडिया, सांगली : पती पत्नीचं नात हे साता जन्माच नात असतं. मात्र, याच पती पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. पतीच्या खुन्या विरुद्ध पत्नीच फितूर झाली आहे. सांगलीत हा धक्कादायक प्रकार घडला. फितूर साक्षीदारांवर फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 340 प्रमाणे कारवाई करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत (sangali Crime News) . 

कवठेमंकाळ तालुक्यातील धबडेवाडी येथे 20 ऑगस्ट 2021 रोजी भरत ज्ञानदेव खोत यांची गावातील दोन लोकांनी धारधार शस्त्राने तोंडावर, डोक्यावर वार करुन हत्या केल्याची घटना घडली होती. याबाबत सुवर्णा भरत खोत यांनी कवठेमहांकाळ पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली होती. फिर्यादीचा पती भरत खोत यांच्या भावकीतीलच एका खोत कुटुंबातील स्त्री बरोबरच अनैतिक संबंध असल्याचा संशय घेऊन त्याच स्त्रीच्या दिराने आणि त्याचे मित्र असे दोघांनी मिळून फिर्यादीच्या घरासमोरच भरत खोत यांचा खून केला असे फिर्यादीने म्हटले होते.

या प्रकरणातील मुख्य आरोपीने जामीनासाठी ब-याच वेळा प्रयत्न करुनही जामीन मंजूर झाला नाही. त्यातील एक आरोपी जेलमध्ये होता. अशी वस्तुस्थिती असताना या प्रकरमाची अंतिम सुनावणी होऊन मयताची पत्नी सुवर्णा भरत खोत यांचा न्यायालयात शपथेवर जबाब झाला. 

या प्रसंगी मूळ फिर्यादी वर्दीदार फितूर होवून आरोपी पक्षाशी संगनमत करुन जबाब दिले. त्यामुळे सरकार पक्षातर्फे  जिल्हा सरकारी वकील  रियाज एस. जमादार यांनी फितूर फिर्यादीची कौशल्यपूर्वक उलट तपास घेतला. सरकारी पक्षातर्फे perjury अनुषंगाने केस लॉ सादर केले. त्याच नमूदप्रमाणे, फिर्याद दाखल प्रसंगी वापरली जाणारी पोलीस यंत्रणा त्यानंतर तपास कामासाठी वापरली जाणारी पोलीस यंत्रणा त्यानंतर न्यायनिवाड्याच्या दृष्टीने सरकारी वकील व न्यायालयीन कामकाजासाठी वपरली जाणारी यंत्रणा या सर्वांचा खर्च सरकार करीत असते. अशा फितूर झालेल्या साक्षीमुळे आरोपीस शिक्षा होवू शकत नाही तसेच खरेखुरे न्यायदान होवू शकत नाही. त्यामुळे फितूर होणा-या साक्षीदाराची गय करु नये असा युक्तीवाद वकिल रियाज एस. जमादार यांनी केला.

त्यानुसार न्यायालयाने फितूर साक्षीदारास फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 340 प्रमाणे चौकशी कारवाईचा आदेश दिला आहे. वरील सर्व बाबींचा विचार होऊन सांगली येथील मे. जिल्हा आणि सत्र न्यायाधीश, एस.पी. पोळस यांनी सदर फिर साथीदारावर perjury अनुषंगाने कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.