Dhule Crime News: अंधश्रद्धा निर्मूलन समिती अंधश्रद्धा रोखण्यासाठी प्रयत्न करत आहे. अशातच आजही राज्यात जादूटोण्यासारखे प्रयोग करतात. धुळे जिल्हा न्यायालय परिसरात जादूटोण्याचा धक्कादायक प्रकार उडकीस आहे (Dhule Crime News). वकिलाची बोलती बंद करण्यासाठी मौलानाची मदत घेण्यात येत होती. अखेरीस पोलिसांनी जादूटोणा (Jadu Tonako) करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे.
निसार शेख अमीर खाटीक नावाच्या व्यक्तीने पंढरीनाथ पाटील नावाच्या व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या दिवाणी खटल्यात युक्तिवाद सुरु असताना निसार याने पाटील यांचे वकील शामकांत पाटील यांचे चोरून लपून फोटो काढले. ही बाब वकिलांच्या लक्षात आली. त्यांनी न्यायालयच्या परवानगीने निसार यांचा मोबाईल तपासायला लावला.
यानंतर धक्कादायक माहिती समोर आली. निसार याने न्यायालयात, पाटील यांचे फोटो काढून ते नाशिक येथील मौलानाला पाठवले होते. फोटो पाठवल्यानंतर त्याने मौलाना मेसजही केला. हा वकील आपल्या विरोधात खूप बोलतो, त्याची बोलती बंद झाली पाहिजे किंवा त्याने जास्त बोलू नये यासाठी मौलानाने जादूटोणा करावा असा मेसेज केला होता. यानंतर वकील शामकांत पाटील यांनी धुळे शहर पोलीस ठाणे गाठले.
निसार खाटीक याच्या विरोधात जादूटोणा विरोधी कायज्ञातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नासिर खाटीकला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, या धक्कादायक प्रकारमुळे न्यायालय परिसर खळबळ उडाली आहे.
सांगली जिल्ह्यातील (Sangli news) आटपाडीतील एका रुग्णालयात असाच धक्कादायक प्रकार घडला होता. आयसीयूतमध्ये उपचार घेत असेलल्या रुग्णाचा डोक्यावर हात ठेवून तंत्र मंत्र म्हणत उपचार केले जात होते. मंत्रतंत्र आणि जादूटोणाच्या कृत्यास वरद हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आदित्य रावण यांनी विरोध केला असता त्यांच्याशी संबंधित रुग्णाच्या नातेवाईकांनी त्यांच्याशी हुज्जत घातली.