इमारतीच्या २७व्या मजल्यावरुन पडून मुलीचा मृत्यू

इमारतीच्या २७व्या मजल्यावरुन पडून एका मुलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना ठाण्यात घडली. 

Updated: Aug 3, 2017, 12:23 PM IST
इमारतीच्या २७व्या मजल्यावरुन पडून मुलीचा मृत्यू title=

ठाणे : इमारतीच्या २७व्या मजल्यावरुन पडून एका मुलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना ठाण्यात घडली. 

ज्योती शर्मा असे या १६ वर्षीय मुलीचे नाव आहे. ज्योती हिरानंदनी मेडोजमधील मेफ्लॉवर सोसायटीत आपल्या कुटुंबासह राहत होती. ती वसंत विहार हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये कॉमर्समध्ये तिच शिक्षण सुरु होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी संध्याकाळी ही घटना घडली.   हा अपघात घडला तेव्हा ज्योती बेडरुममध्ये होती. यावेळी वाळत घातलेला टॉवेल घेण्यासाठी ती बाल्कनीत गेली. मात्र त्याचवेळी ती घसरली आणि खाली पडली. ही घटना घडली तेव्हा तिची आई आणि बहीण दुसऱ्या खोलीत होते. त्यांच्या खिडकीला ग्रिल नसल्याने ही घटना घडली. 

 पोलिसांनी याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केलीये. दरम्यान, हा अपघात की आत्महत्या याबाबतचा तपास पोलीस करत आहेत.