Thane School Controversy: बदलापूर विद्यार्थींनीचे शोषण प्रकरणानंतर पालकांना आपल्या पाल्ल्यांना शाळेत पाठवायलाच भीती वाटतेय. जवळजवळ सर्वच शाळांमध्ये ही स्थिती आहे. आपल्या मुलांना शाळेत चांगली वागणूक मिळावी, सुरक्षित वाटावरण असावे यासाठी प्रत्येक पालक जागरुक असतो. दरम्यान ठाणे शहरातील नौपाडाच्या सरस्वती मंदिर ट्रस्टची सरस्वती विद्यामंदिर शाळा वादात सापडली आहे. या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या शिक्षिका पंकजा राजे यांच्यामुळे शाळेने हा वाद ओढवून घेतलाय. या शिक्षिका चिमुकल्या विद्यार्थ्यांसमोर अरेरावी करत असून विद्यार्थ्यांना अपमानास्पद वागणूक देत असल्याच्या तक्रारी शाळा प्रशासनाला अनेकदा करण्यात आल्या आहेत.
शिक्षेकवर कारवाईची प्रक्रिया सुरू असतानाच काही पालकांनी मनसे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्याकडे याबाबत वाच्यता केली. यानंतर त्यांनी काही पालकांना सोबत घेत शाळेला भेट दिली. या मुजोर असलेल्या महिला शिक्षिका विरोधात आजपर्यंत कारवाई का केली नाही? असा प्रश्न जाधवांनी शाळा प्रशासनाला विचारला. शिक्षिकेवर तात्काळ कारवाई करा अन्यथा ठाणेकर या ठिकाणी मोठ्या संख्येने जमा होतील असा इशारा दिला आहे.त्या सोबतच पालकांच्या वतीने नौपाडा पोलिस ठाण्यात महिला शिक्षिकेविरोधत तक्रार नोंदवण्यात येणार असल्याचे सांगितले.
पंकजा राजे शिक्षिका या शाळेत पाच वर्षांपूर्वी आले असून त्या या शाळेच्या बाहेरच्या वातावरणात असल्यामुळे त्यांच्याकडून बऱ्याच वेळा चुका झालेल्या आहेत मागेही त्यांना ताकीद देण्यात आली होती. आताही त्यांच्यावर आधीच कारवाईची प्रक्रिया सुरू असून याबाबत पालक,महापालिका यांनाही कल्पना देण्यात आल्याची माहिती सरस्वती मंदिर ट्रस्टचे व्यवस्थापकीय विश्वस्त सुरेंद्र दिघे यांनी दिली
पालकांनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने महिला शिक्षिकेविरोधात शिक्षण विभागाकडे महिला शिक्षकच्या विरोधात अहवाल पाठवण्यात आलाय. शिक्षिकेस बडतर्फ करण्याबाबतची कारवाई सुरू करण्यात आली असल्याची माहिती दिली आहे. दरम्यान पालकांनी महिला शिक्षकेला पुढील कारवाई होईपर्यंत शाळेमध्ये येऊ देण्यास बंदी घालावी अशी मागणी केल्यानंतर व्यवस्थित शाळा प्रशासनाने महिला शिक्षकेत यापुढे कोणत्याही वर्गावर शिकवण्यासाठी पाठवणार नाही असे लेखी पालकांकडे लिहून दिले आहे. शाळेतील विद्यार्थ्यांना विविध पद्धतीने त्रास देऊन विद्यार्थ्यांचे शारीरिक व मानसिक खच्चीकरण करण्याचे काम शिक्षिका करतअशी कविता लिहिण्यात आली होती की 'हे देवा घरी जाऊन खोटंबोलतात'..आणि खोटं सांगतात... असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. मागील पाच ते सहा वर्षांपासून असा प्रकार सुरू असताना सुद्धा शाळा व्यवस्थापनाने याकडे दुर्लक्ष केलं असल्यामुळेच आम्हाला आज हे आंदोलन करावं लागले आहे. अजूनही व्यवस्थापन त्या शिक्षिकेला काढून टाकण्या बद्दल आम्हाला शाश्वती देत नाही. म्हणूनच आता मी माझ्या मुलाला जी मारहाण केली होती त्या महाराणी संदर्भात नौपाडा पोलीस ठाण्यात पालक तक्रार दाखल करायला आहे.