ठाकरे सरकार धोक्यात? पाहा शिंदेंच्या बंडखोरीनंतर महाविकासआघाडीकडे सध्या किती आमदार?

राज्यातील महाविकासआघाडी सरकार अल्पमतात आलं आहे का?

Updated: Jun 21, 2022, 02:27 PM IST
ठाकरे सरकार धोक्यात? पाहा शिंदेंच्या बंडखोरीनंतर महाविकासआघाडीकडे सध्या किती आमदार? title=

मुंबई : राज्यात विधानपरिषद निवडणुकीनंतर मोठा राजकीय भूकंप पाहायला मिळाला. शिवसेनेचे सर्वात मोठे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे हे बंडखोरीच्या तयारीत असून एकूण 35 आमदार घेऊन ते सुरतमध्ये दाखल झाले आहेत. त्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.

एकनाथ शिंदे यांच्या पुढच्या भूमिकेकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून आहे. कारण ते काय भूमिका घेतात यानंतर राज्यातील सरकारचं अस्तित्व ठरणार आहे. जर एकनाथ शिंदे यांच्यासोबत 35 आमदार असतील महाविकासआघाडीकडे बहुमत उरतं का?

35 आमदार शिंदेंसोबत असतील तर सरकारची काय स्थिती?

राज्यात सत्तेसाठी बहुमताचं संख्याबळ- 144 आहे.

शिवसेना-55
राष्ट्रवादी-53
काँग्रेस-44
इतर-17

एकूण-169

एकनाथ शिंदे यांच्या सोबत जर 35 आमदार असतील तर मग हे संख्याबळ 169-35 = 134 होणार आहे. म्हणजे महाविकासआघाडी सरकारकडे 134 आमदार राहतील. ज्यामुळे सरकार अल्पमतात येऊ शकतं.

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत शिवसेनेचे 18 आमदार उपस्थित असल्याची माहिती मिळाली आहे.