Leaders : लाखोची नोकरी सोडून बनवली देशातील सगळ्यात मोठी वाईन कंपनी

200 एकर परिसरात सुरू करण्यात आलेला हा प्रोजेक्ट काहिच दिवसांत 1800 एकरपर्यंत पसरला.

Updated: Nov 2, 2021, 08:22 PM IST
Leaders :  लाखोची नोकरी सोडून बनवली देशातील सगळ्यात मोठी वाईन कंपनी title=

मुंबई : कोरोना विषाणूमुळे देशातील पर्यटनालाही मोठा फटका बसला आहे. याचच उदाहारण म्हणजे महाराष्ट्रातील नाशिकमधील सुला वाइनमध्ये देखील पहायला मिळालं. सुला वाईन ही भारतातील सगळ्यात मोठ्या ब्रांडपैंकी एक आहे. या वाईनची डिमांड भारतातच नाही तर विदेशात देखील खूप पहायला मिळते. हजारो एकरावर पसरलेला सुला वाईन  हा प्रोजेक्ट लोकांना खूप आकर्षित करतो. मुंबईपासून १८० किमी अंतरावर असलेल्या नाशिकमध्ये १९५० मध्ये सुला वाईनची सुरुवात झाली.

स्टॅनफोर्ड यूनिवर्सिटीमधून ग्रॅज्यूएशन आणि पोस्ट ग्रॅज्यूएशन  करणारे राजीव सामंत यांनी सुलावाईनची सुरुवात केली. अमेरिकेतील एका प्रतिष्ठित विद्यापीठातून अर्थशास्त्रात पदवी घेतलेल्या राजीव यांनी  इंजीनयिरिंगमध्ये मास्टरची डिग्री मिळवली.शिक्षण पुर्ण केल्यानंतर राजीव सामंत कॅलिफॉर्नियातील ऑरेकलमध्ये नोकरी करु लागले. अमेरिकेतील धावळीच जिवनाचा त्यांना कंटाळा आला आणि म्हणूनच ते भारतात परतले. राजीव यांच्या परिवाराकडे नाशिक जवळ २० एकर जमीन होती. याच जमिनीमध्ये राजीव यांनी आंब्याच्या बागेपासून ते गुलाब, टिकवूड ते द्राक्षांची  शेती त्याच जागेत शेती केली. 

१९६६मध्ये राजीव यांना जाणवलं की, नाशिकचं वातावरण आणि जलवायु वाईन बनवण्यासाठी द्राक्षांची शेतीसाठी एकदम परफेक्ट आहे. यानंतर जेव्हा ते कॅलिफॉर्नियाला परत गेले. तेव्हा त्यांची भेट  प्रसिद्ध वाईनमेकर कॅरी डॅमस्कीसोबत झाली. कॅरी डॅमस्की यांनी राजीव यांचं म्हणणं ऐकलं आणि कॅरी डॅमस्की यांनी सुला वाईन सुरू करायला मदत केली. राजीव यांनी आपल्या वाईनच्या ब्रँडचं नाव सुला ठेवलं. आई सुलभा यांच्या नावावरुन सुला नाव ठेवण्यात आलं. 

कंपनी सुरू केल्यानंतर काही वर्षांतच व्यवसाय वाढला आणि राजीव यांनी द्राक्षांच्या नवीन जातींची लागवड करण्यास सुरुवात केली.  200 एकर परिसरात सुरू करण्यात आलेला हा प्रोजेक्ट काहिच दिवसांत 1800 एकरपर्यंत पसरला. सुला वाईनमध्ये दररोज 8 ते 9 हजार टन द्राक्षं क्रश करून वाईन तयार केली जाते. सुला वाईनचे चीफ वाईन मेकर करण वसानी यांच्या म्हणण्यानुसार, सुला व्हाईट आणि रेड वाईन बनवते. सुला वाईन्सने नाशिकला एक वेगळी ओळख दिली.

सुला वाईनला भेट देणाऱ्यांना केवळ वाईन खरेदी करण्याची संधी मिळत नाही. तर तिथे वाईन कशी बनवली जाते हे देखील ते पाहू शकतात. सुला वाईनला भेट देणाऱ्या पर्यटकांना वाईन टेस्टही करायला दिल्या जातात. याशिवाय इतर देशांमध्येही या वाईनची निर्यात केली जाते.