कोल्हापूर : Omicron Pandemic : ओमायक्रॉनचा धोका वाढत आहे. ओमायक्रॉन महाराष्ट्राच्या वेशीवर आहे. त्यामुळे योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. महाराष्ट्र - कर्नाटक सीमेवरील तपासणी नाके अखेर सुरू करण्यात आलेत. या नाक्यावर पोलिसांसह आरोग्य विभागाचे कर्मचारी तैनात करण्यात आलेत. हे कर्मचारी दोन डोस घेतलेल्या तसेच RTPCR रिपोर्ट असणाऱ्या प्रवाशांनाच जिल्ह्यात प्रवेश देत आहेत.
दरम्यान, महाराष्ट्र - कर्नाटक सीमेवर तपासणी नाके उभारण्यात आले आहेत. पोलिसांसह आरोग्य विभागाचे कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. दरम्यान, ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर सीमा तपासणी नाक्यांवर कडक तपासणीची गरज ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवर उभारण्यात आलेल्या तपासणी नाक्यांवर कडक तपासणी होत नसल्याचे मुश्रीफ यांनी म्हटले आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
जगात धुमाकूळ घालणाऱ्या अमायक्रॉननं अखेर भारतात शिरकाव केलाय. महाराष्ट्राच्या शेजारील कर्नाटकात ओमायक्रॉनचे दोन रुग्ण आढळून आले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं ही माहिती दिलीय.
महाराष्ट्र राज्यातही आफ्रिकेतून आलेल्या सहा जणांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रही गॅसवर आहे. त्याचवेळी एक धक्कादायक बातमी पुढे आली आहे. कर्नाटकातला ओमायक्रॉनग्रस्त देशाबाहेर पळाल्याची माहिती मिळत आहे. रिपोर्ट येण्याआधीच तो बंगळुरूतून दुबईत पसार झालाय. 27नोव्हेंबरला मध्यरात्रीच रूग्ण दुबईला पळाल्याचे सांगण्यात येत आहे. धक्कादायकबाब म्हणजे खासगी लॅबकडून निगेटिव्ह रिपोर्ट मिळवत तो पसार झाल्याचे सांगितले जात आहे.
कर्नाटकात दक्षिण आफ्रिकेतून आलेला ओमायक्रॉनग्रस्त जोहान्सबर्गच्या एका लॅबचा तो प्रतिनिधी होता. 20 नोव्हेंबरला तो भारतात आला होता. तो भारतात दाखल झाला तेव्हा त्याच्याकडे निगेटिव्ह रिपोर्ट होता, अशी माहिती मिळत आहे. मात्र बंगळुरूच्या एअरपोर्टवर झालेल्या चाचणीत तो पॉझिटिव्ह आढळला.