अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती : केंद्र सरकारने केलेल्या कृषी विधेयकाच्या विरोधात शेतकरी आक्रमक झाले असून शेतकऱ्यांनी मंगळवारी देशभरात भारत बंदची हाक दिली. या बंदला कुठे उस्फुर्त तर कुठे संमिश्र प्रतिसाद मिळताना दिसत आहे. अशा या बंदमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येकालाच राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सलाम आणि मानाचा मुजरा केला आहे.
आज भारत बंदला अधिक यशस्वी करावा आणि शेतकऱ्यांच्या आंदोलनात खंबीरपणे उभे राहावे असे आव्हान राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केले. बच्चू कडू दिल्ली येथील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मोटार सायकल रॅली घेऊन दिल्लीच्या दिशेने रवाना झाले आहेत. आज त्यांच्या आंदोलनाचा पाचवा दिवस आहे.
सोमवारी त्यांचा मुक्काम मध्यप्रदेशातील मंदोरा येथील गुरुद्वारा मध्ये होता. आज ते उत्तर प्रदेश च्या दिशेने रवाना झाले असून दहा तारखेपर्यंत दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनामध्ये सहभागी होतील.
केंद्र सरकारच धोरणं डाकू प्रमाणं
Lockdown लॉकडाऊनच्या काळात न दिसणाऱ्या कोरोना विषाणूमुळे आपण बंद ठेवला मात्र आता हा दिसणारा अतिरेक अन्याय आहे. दर दिवसा शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहे. एखाद्या डाकू प्रमाने केंद्र सरकारची भूमिका आहे. या केंद्र सरकारच्या धोरणामुळे शेतकरी लुटून जात असा आरोप बच्चू कडू यांनी केला.