SSC Exam : All The Best! आजपासून दहावीची परीक्षा, पहिल्यांदाच… 56 तृतीयपंथी देणार परीक्षा

SSC Exam : आजपासून दहावीची परीक्षा सुरुवात होणार आहे. बोर्डाकडून या परीक्षांची जोरदार तयारी करण्यात आली असून पेपरच्या वेळेत विद्यार्थ्यांना 10 मिनिटं वाढवून मिळणार आहेत. 

नेहा चौधरी | Updated: Mar 1, 2024, 08:22 AM IST
SSC Exam : All The Best! आजपासून दहावीची परीक्षा, पहिल्यांदाच… 56 तृतीयपंथी देणार परीक्षा title=
SSC Exam All The Best From today the 10th exam 10 minutes extension in the paper time for the first time 56 Transgender exams will be given

SSC Exam : महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून इयत्ता दहावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात होणार आहे. यंदा या परीक्षेसाठी राज्यभरातून तब्बल 16 लाख 9 हजार 445 विद्यार्थी परीक्षा देणार आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचा आकडा हा 32 हजार 189 ने वाढलाय. 1 मार्च ते 26 मार्चपर्यंत दहावीची परीक्षा असणार आहे. यंदा विद्यार्थ्यांना पेपरच्या वेळेत 10 मिनिटं वाढवून मिळणार आहेत. त्याशिवाय विशेष म्हणजे यंदा राज्यभरातून पहिल्यांदाच 56 तृतीयपंथी परीक्षा देणार आहेत. (SSC Exam All The Best From today the 10th exam 10 minutes extension in the paper time for the first time 56 Transgender exams will be given)

यंदा दहावी बोर्डाचे पेपर हे दोन सत्रात होणार असून सकाळी 11 वाजता आणि दुपारी 3 वाजता पेपर होणार आहेत. 

मुलांना हे नियम लक्षात ठेवा!

 परीक्षेच्या निर्धारीत वेळेपूर्वी किमान अर्धा तास अगोदर परीक्षा केंद्रावर जाणं बंधनकारक आहे. 
गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही परीक्षेसाठी पेपरच्या निर्धारित वेळेनंतर शेवटी 10 मिनिटं विद्यार्थ्यांना जास्तीचे मिळणार आहेत. 
गैरप्रकार केल्यास विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात होणार आहे. 
कॉपी प्रकरणे थांबविण्यासाठी केंद्रावर बैठे पथक असणार आहे. 
राज्य मंडळाची आणि जिल्हा प्रशासनाची मिळून सुमारे 400 पथक नियुक्त करण्यात आले आहेत.
विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी राज्य मंडळाने विभागनिहाय हेल्पलाइन सुरु करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी 020 - 27705271, 020-25505272 या फोन नंबर देण्यात आले आहेत.