सायन पनवेल महामार्गावरील उड्डाणपूलावर सहा वाहनांचा अपघात

  सायन - पनवेल महामार्ग उड्डाणपूलावर सहा वाहनांचा अपघात झाला. हा अपघात पहाटे  २ वाजून १५ मिनिटांच्या सुमारास झाला. यात सहा जण जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेय.

Updated: Mar 22, 2018, 06:59 PM IST
सायन पनवेल महामार्गावरील उड्डाणपूलावर सहा वाहनांचा अपघात  title=

नवी मुंबई :  सायन - पनवेल महामार्ग उड्डाणपूलावर सहा वाहनांचा अपघात झाला. हा अपघात पहाटे  २ वाजून १५ मिनिटांच्या सुमारास झाला. यात सहा जण जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेय.

 त्यात डम्पर आणि एचपी गॅस टॅंकरच्यामध्ये स्कोडा गाड़ी येऊन दबली गेली स्कोडा गाड़ीतील जखमींना आणि इतर गाड्यांमधील जखमीना एमजीएम वाशी हॉस्पिटल आणि अपोलो हॉस्पिटल सीबीडी इथे दाखल करण्यात आलं. 

या अपघातात सहा लोक जखमी आहेत. अपघातातील सर्व वाहने ही हाइड्रा आणि क्रेनच्या मदतीने बाजूला करण्यात आली.यामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला होता