नागपुर हादरलं! दगडाने ठेचून तरूणाची निर्घुण हत्या

उपराजधानीत हत्यासत्र सुरूच 

Updated: May 29, 2021, 10:10 AM IST
नागपुर हादरलं! दगडाने ठेचून तरूणाची निर्घुण हत्या  title=

अमर काणे, झी मीडिया, नागपूर :  नागपूर शहरात हत्यासत्र सुरुच आहे. शुक्रवारी शहरातील लष्करीबाग परिसरात एका तरुणाचा दगडाने ठेचून निर्घृण खून करण्यात आल्याची घटना घडली आहे. कपिन बेन( 18) असं मयत तरुणाचं नाव आहे. याप्रकरणातील तिन्ही आरोपी पसार झाले आहेत. त्यांचा शोध सुरू आहे.

नागपुरातील लष्करीबाग परिसरात शीतला माता मंदिराच्या मागील गल्लीत ही घटना घडली. कपिल बेन या परिसरात उभा असताना उमेश चिकाटे,कालू आणि भुरू यांच्याशी खर्रा खाताना त्याचा वाद झाला.  त्यांच्या वाद विकोला गेला. आणि उमेश,कालू आणि भूरू यांनी वादातून कपिलची माराहण करत खाली पाडले. आणि दगडाने ठेचून त्याची हत्या केली..त्यानंतर तिन्ही आरोपी तिथून पसार झालेत.

या हत्येच्या घटनेनंतर  लष्करीबाग परिसरात एकच खळबळ उडाली. पाचपावली पोलीस स्टेशनच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेलं हत्यासत्रामुळं नागरिकांत दहशत आणि संताप आहे. कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीनं कठोर पाऊलं उचलण्याची मागणी होत आहे. आरोपींच्या संदर्भात पोलिसांना माहिती मिळाली असुन त्यांना अटक करण्यासाठी पाचपावली पोलीस ठाण्याचे डीबी पथक रवाना करण्यात आले आहे. परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला. कपीलच्या परिचितांनी घटनास्थळी येऊन संताप व्यक्त करणे सुरू केले.