पुणे कार अपघातात धक्कादायक माहिती समोर, बिघाड असलेली पोर्शे कार दिली लेकाच्या हाती

Pune Porsche Accident Case : महागड्या पोर्श कारच्या अपघाताबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. ज्या कारने दोघांचा जीव घेतला ती कार बिघाड असलेली होती. यानंतरही ती कार मुलाच्या हाती देण्याची चूक विशाल अग्रवालन केली.

अरूण म्हेत्रे | Updated: May 23, 2024, 05:58 PM IST
पुणे कार अपघातात धक्कादायक माहिती समोर, बिघाड असलेली पोर्शे कार दिली लेकाच्या हाती title=

Pune Porsche Accident Case : पोर्श कारने दोघांना चिरडल्यानंतर जमावाने अल्पवयीन आरोपीला चोप दिला. दारु ढोसून त्या पोराने दोघांचा जीव घेतला. मात्र ज्या महागड्या कारने दोघांना चिरडलं त्या कारमध्ये तांत्रिक बिघाड होता. असं असतानाही विशाल अग्रवालने (Vishal Agrawal) पोर्शे कारची (Porsche) चावी आपल्या लेकाच्या हातात दिली अशी धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. एवढंच नाही तर मुलाने कार चालवायला मागितली तर त्याला चालवू दे.. तू बाजुला बस अशी सूचनाही विशाल अग्रवालने ड्रायव्हरला केली होती.

ड्रायव्हरचा जबाब
अपघात घडला त्या रात्री मी गाडी चालवतो असं मुलाला म्हणालो, मात्र तुम्ही शेजारी बसा मी गाडी चालवतो असं  सांगत मुलाने गाडी हातात घेतली. असं ड्रायव्हरच्या जबाबत नमूद आहे. बिघाड असलेली गाडी रस्त्यावर आणणं तसेच ड्रायव्हर ऐवजी मुलाने गाडी चालवणे या दोन्ही गोष्टी गंभीर असल्याच निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं आहे.

पोर्शे कारमध्ये होता बिघाड
अपघातग्रस्त कार नंबर प्लेट शिवाय धावत होती. गाडीत बिघाड असल्यानेच बंगळुरूच्या डीलरकडे त्यासंदर्भात पाठपुरावा सुरु होता. बिघाड असलेली कार रस्त्यावर आणणे तसंच ड्रायव्हरऐवजी मुलाने गाडी चालवणे या दोन्ही गोष्टी गंभीर असल्याचं निरिक्षण कोर्टाने नोंदवलंय. दरम्यान आरोपी विशाल अग्रवालच्या ड्रायव्हरलाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. 50 वर्षीय हा कार चालक आहे. पोलीस त्याची चौकशी करताहेत. प्रत्यक्ष अपघात घडला त्यावेळी हा चालक गाडीमध्ये होता. अल्पवयीन आरोपीच्या वडिलांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.. मात्र जर लाडक्या मुलाच्या हातात बिघडलेल्या कारची चावी देण्याची चूक बापाने केली नसती तर कदाचित दोघांचा जीव वाचला असता.

आरोपींच्या आजोबांची चौकशी
अपघातातील आरोपीचे आजोबा सुरेंद्र कुमार अग्रवाल यांची गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू करण्यात आलीय. एस के अग्रवाल जबाब देण्यासाठी पोलीस आयुक्तालयात दाखल झालेयत. सुरेंद्र कुमार यांनी छोटा राजनची मदत घेतल्याचा आरोप शिवसेनेचे नेते अजय भोसलेंनी केला होता. त्या प्रकरणी ही चौकशी सुरू झालीय. सुरेंद्र कुमार अग्रवाल हे विशाल अग्रवाल यांचे वडील आहेत. कार अपघात प्रकरणानंतर हे प्रकरण उघडकीस आल्याने आता कारवाईला वेग आलाय. या सर्व चौकशीत संपूर्ण सहकार्य करणार असल्याचं सुरेंद्र अग्रवाल यांनी म्हटलंय, त्या प्रकरणी ही चौकशी सुरू झाली.

उत्पादन शु्ल्क विभाग अॅक्शन मोडवर
दरम्यान, कल्याणी नगर अपघातानंतर उत्पादन शुल्क विभाग सक्रिय झाला आहे. पुणे शहर आणि जिल्ह्यातील मद्यविक्रीचे 32 परवाने रद्द करण्यात आले आहेत. नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. 
अवैध मद्यसाठा बाळगणे, परवानगी पेक्षा अधिक काळ बार चालू ठेवणे आधी तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली. उत्पादन शुल्क विभागाकडून 14 पथकांची स्थापना करण्यात आली आहे.