शिवसेनेचं 'हिंदुत्व'... देवेंद्र फडणवीसांनी उलगडलं 'हे' रहस्य

भारतीय जनता पक्षाचा श्वास हिंदुत्व आणि विकास आहे. पण, शिवसेनेचं हिंदुत्व म्हणजे...  

Updated: Apr 10, 2022, 03:25 PM IST
शिवसेनेचं 'हिंदुत्व'... देवेंद्र फडणवीसांनी उलगडलं 'हे' रहस्य title=

कोल्हापूर : राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील सगळेच 100 कोटींच्या वसुलीच्या मागे लागले आहेत, हे काय आम्हाला सुरक्षा देणार? महाराष्ट्रात सरकार नाही तर भ्रष्टाचार आहे. कोरोना काळात इंग्लिश दारुवरचा टॅक्स कमी केला मग हे बेवड्यांचे सरकार आहे का? असे सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी कोल्हापुरात केला.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackrey ) यांनी मशिदीवरील भोंगे उतरले नाही तर त्यासमोर स्पीकरवर हनुमान चालीसा लावण्याचे आदेश मनसैनिकांना दिले. त्यानुसार घाटकोपर आणि कुर्ला येथे मनसैनिकांनी स्पीकरवर हनुमान चालीसा ( Hanuman Chalisa ) लावली. पोलिसांनी त्यावर कारवाई केली यावर भाष्य करताना फडणवीस म्हणाले, आघाडी सरकारला मशिदीवरील भोंगे ऐकून राग येत नाही. पण, हनुमान चालीसा ऐकून राग का येतो, असा सवाल त्यांनी केला.

मंदिरावर हनुमान चालीसा म्हटल्याने सरकारला इतका राग का येतो हे आघाडी सरकारलाच विचारा. मुंबईमध्ये एका कॅलेंडरवर 'जनाब बाळासाहेब ठाकरे' ( Janab Balasaheb Thackrey ) असं छापून ती कॅलेंडर वाटली गेली. तेव्हाच, सेनेचं हिंदुत्व कुठं गेलं हे कळलं असा टोला फडणवीस यांनी लगावला.

 

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Nana Patole ) यांना काहीही न पाहता, न समजता बोलण्याची सवय लागली आहे. नाना पटोले यांना भगव्याचा इतका तिटकारा का येतोय हे कळत नाही. पण याचे उत्तर त्यांना द्यावेच लागेल असेही ते म्हणाले.