काय झाडी, काय डोंगर, काय हाटेल... शिंदे गटात बापूंनी पुन्हा म्हणून दाखवला हा सुपरहिट डायलॉग

महाराष्ट्रात सध्या शिवसेना आमदार शहाजीबापू पाटील यांच्या या डायलॉगची जोरदार चर्चा आहे. शिंदे समर्थक आमदारांना ही पडली या वाक्याची भूरळ.

Updated: Jun 28, 2022, 05:31 PM IST
काय झाडी, काय डोंगर, काय हाटेल... शिंदे गटात बापूंनी पुन्हा म्हणून दाखवला हा सुपरहिट डायलॉग title=

गुवाहाटी : शिवसेनेचे सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या या डायलॉगची सध्या संपूर्ण राज्यात चर्चा आहे. या वाक्याची भुरळ महाराष्ट्राला पडलेली आहे. सोशल मीडियावर याचा पूर आलाय. त्यातच आता हा ट्रेंड जेव्हा गुवाहाटीत असलेल्या शिंदे गटात पोहोचला तेव्हा त्यांनी ही त्यांना हे वाक्य पुन्हा बोलण्यासाठी साद घातली. 

आज जेव्हा सगळे आमदार हॉटेलच्या लॉबीत जमले होते तेव्हा शहाजी बापू यांचं एकनाथ शिंदे यांनी कौतूक केलं. एकनाथ शिंदे यांनी बापूंना पुन्हा एकदा हे वाक्य म्हणून दाखवण्याची विनंती केली.

शहजीबापू यांनी देखील मग हे वाक्य म्हणून दाखवलं. आता हा व्हिडिओ ही व्हायरल होतोय. सुपरहीट झालेल्या या वाक्याने संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घातला आहे.