आताची मोठी बातमी । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे बंडखोर आमदारांना आवाहन

Shiv Sena Crisis Update :आताची सगळ्यात मोठी बातमी. मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी गुवाहाटी येथील शिवसेना आमदारांना आवाहन केले आहे.  

Updated: Jun 28, 2022, 03:23 PM IST
आताची मोठी बातमी । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे बंडखोर आमदारांना आवाहन title=

मुंबई : Shiv Sena Crisis Update :आताची सगळ्यात मोठी बातमी. मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी गुवाहाटी येथील शिवसेना आमदारांना आवाहन केले आहे. आपण गेल्या काही दिवसांपासून गुवाहाटी येथे अडकून पडलेले आहात. आपल्याबाबत रोज नवीन माहिती समोर येत आहे. आपल्यातील बरेच संपर्कातही आहेत आपण आजही मनाने शिवसेनेत आहात. शिवसेना पक्ष प्रमुख आणि कुटुंब प्रमुख म्हणून आजही मला तुमची काळजी वाटत आहे. समोर येऊन बोला आपण मार्ग काढू, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले, आपल्यापैकी काही आमदारांच्या कुटुंबातील सदस्यांनी देखील संपर्क साधून आपल्या मनातील भावना मला कळवल्या आहेत. आपल्या भावनांचा मी शिवसेनेचा कुटुंबप्रमुख म्हणून आदर करतो. कुटुंबप्रमुख म्हणून तुम्हाला मनापासून सांगतो अजूनही वेळ गेलेली नाही. माझं आपल्याला सगळ्यांना आवाहन आहे. आपण या माझ्या समोर बसा. शिवसैनिकांच्या आणि जनतेच्या मनातील संभ्रम दूर करा, यातून निश्चित मार्ग निघेल, असे ते म्हणाले.

आपण एकत्र बसून यातून मार्ग काढू . कोणाच्याही कोणत्याही भूल थापांना बळी पडू नका , शिवसेनेने जो मान सन्मान तुम्हाला दिला तो कुठेही मिळू शकत नाही , समोर आलात बोललात तर मार्ग निघेल.  शिवसेना पक्ष प्रमुख आणि कुटुंब प्रमुख म्हणून आजही मला तुमची काळजी वाटत आहे . समोर येऊन बोला आपण मार्ग काढू, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.