शरद पवार गटाने अजित पवार गटाला कन्फ्यूज करुन टाकले; आमदार निलंबन याचिकेच्या सुनावणीआधी काकांची मोठी खेळी

आमदार अपात्रतेसाठी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचेच विधान परिषद सभापतींकडे दोन अर्ज आले आहेत. जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाडांनी दोन स्वतंत्र अर्ज केल्यानं अधिकारी संभ्रमात आले आहेत. 

वनिता कांबळे | Updated: Sep 11, 2023, 06:39 PM IST
शरद पवार गटाने अजित पवार गटाला कन्फ्यूज करुन टाकले; आमदार निलंबन याचिकेच्या सुनावणीआधी काकांची मोठी खेळी title=

Sharad Pawar Vs Ajit Pawar : शरद पवार गट आणि शरद पवार गट यांच्यातील वादात मोठा ट्विस्ट आला आहे.  शरद पवार गटाने अजित पवार गटाला कन्फ्यूज करुन टाकले आहे. आमदार निलंबन याचिकेच्या सुनावणीआधीच शरद पवार गटाने मोठी खेळी केली आहे. यामुळे या सुनावणीत काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

जितेंद्र आव्हाड यांची 118 पानांची याचिका तर जयंत पाटील यांची 56 पानांची याचिका

शरद पवार गटानं केलेल्या विधान परिषद आमदार निलंबन याचिकेवर या आठवड्यात सुनावणीला सुरुवात होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी ही माहिती दिलीय.  शरद पवार गटाचे जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांनी आमदार निलंबीत करण्यासंदर्भातली याचिका उपसभापतींकडे केलीय. जितेंद्र आव्हाड यांची 118 पानांची याचिका तर जयंत पाटील यांची 56 पानांची याचिका आहे. गटनेत्याच्या आदेशांचं उल्लंघन,पक्ष शिस्त सोडून वर्तन, शिस्तपालन न केल्याचे पुरावे याचिकेसोबत जोडण्यात आल्याची माहिती आहे. 

आमदार अपात्रतेसाठी दोन स्वतंत्र अर्ज आल्याने  विधीमंडळ अधिकारी बुचकळ्यात

राष्ट्रवादीच्या शऱद पवार गटानं विधान परिषद सभापतींकडे आमदार अपात्रतेसाठी दोन स्वतंत्र अर्ज केलेत. एक अर्ज पुरेसा असताना दोन स्वतंत्र अर्ज करण्यात आले आहेत. या दोन अर्जांमुळे विधीमंडळ अधिकारी बुचकळ्यात पडलेत. एका अर्जात विक्रम काळे, सतीश चव्हाण, अमोल मिटकरी, अनिकेत तटकरे यांचा उल्लेख आहे. तर दुस-या अर्जात रामराजे निंबाळकर यांच्या नावाचा उल्लेख आहे. त्यासाठी आता  कायदेशीर सल्ला घेतला जाईल. पहिला अर्ज शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तर दुसरा अर्ज जितेंद्र आव्हाड यांनी केलाय. 

शिंदे गटाचे 40 आणि ठाकरे गटाच्या 14 आमदारांची एकाच दिवशी सुनावणी होणार 

शिवसेना आमदारांच्या प्रत्यक्ष सुनावणीची वेळ ठरलीय, 14 सप्टेंबरला दुपारी बारा वाजता शिवसेना वादावर सुनावणीला सुरुवात होणार आहे. शिंदे गटाचे 40 आणि ठाकरे गटाच्या 14 आमदारांची एकाच दिवशी सुनावणी होणार आहे. विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात तब्बल ३४ याचिकांवर विधानसभा अध्यक्ष सुनावणी घेणार आहेत.. वादी आणि प्रतिवादी आमदारांना पुरावे सादर करत म्हणणं मांडण्याची संधी देण्यात येईल.. प्रत्येक याचिकेची वेगळी सुनावणी केली जाणार आहे.

शिवसेना आमदार सुनावणीवर संजय राऊतांची टीका

शिवसेना आमदार सुनावणीवर संजय राऊतांनी भाष्य केलंय. विधानसभा अध्यक्षांनी एवढ्यात निकाल द्यायला हवा होता, विधिमंडळाचे नियम धाब्यावर बसवून उशीर केला जातोय अशी टीका राऊतांनी  केलीय. तर, राहुल नार्वेकर हे उत्कृष्ट वकील आहेत ते नियमाने निकाल देतील असं बावनकुळे म्हणाले आहेत.