दीपाली सय्यद यांचं पाकिस्तान आणि दुबई कनेक्शन? कुणी केलाय गंभीर आरोप

अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी अनेक लोकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला आहे. सामुदायीक विवाहाच्या नावा खाली बोगस लग्न लावली आहेत. लग्न झालेल्या जोडप्यांची पुन्हा लग्न लावून सामुदायिक विवाह सोहळा आयोजित केला आहे. राज्यपाल भगतसिंह कोशारी यांच्या उपस्थितीत लग्नात दिलेले सोने देखील बनावट आहेत. 

Updated: Dec 7, 2022, 10:08 PM IST
दीपाली सय्यद यांचं पाकिस्तान आणि दुबई कनेक्शन? कुणी केलाय गंभीर आरोप title=

रविंद्र कांबळे, झी मीडिया, सांगली : अभिनेत्री दीपाली सय्यद(Deepali Syyed) यांचे  पाकिस्तान(Pakistan) आणि दुबई(Dubai ) कनेक्शन आहेत. दीपाली सय्यद यांचे माजी स्वीय सहाय्यक भाऊसाहेब शिंदे(Bhausaheb Shinde) यांनी त्यांच्यावर हा गंभीर आरोप केला आहे. दीपाली यांनी अनेक लोकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातलाय सामुदायीक विवाहाच्या नावाखाली बोगस लग्न लावली असाही आरोप देखील भाऊसाहेब शिंदे यांनी केला आहे.  अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी अनेक लोकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला आहे. सामुदायीक विवाहाच्या नावा खाली बोगस लग्न लावली आहेत. लग्न झालेल्या जोडप्यांची पुन्हा लग्न लावून सामुदायिक विवाह सोहळा आयोजित केला आहे. राज्यपाल भगतसिंह कोशारी यांच्या उपस्थितीत लग्नात दिलेले सोने देखील बनावट आहेत. ज्यांची लग्न लावली त्या जोडप्यांना अपत्य आहेत. राज्यपाल भगतसिंह कोशारी आणि दीपाली सय्यद यांचे साटेलोटे आहेत असे गंभीर आरोप दीपाली सय्यद यांचे माजी स्वीयसहाय्यक भाऊसाहेब शिंदे यांनी केला. 

दीपाली सय्यद ट्रस्टच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये हडपले. ट्रस्टच्या खात्यात फक्त 9 हजार, मग कोट्यवधी रुपये आणले कोठून आणि कोणाला दिले असा प्रश्न उपस्थित केला आहे. राज्यपाल भगतसिंह कोशारी आणि दीपाली सय्यद यांचे साटेलोटे असून दिपाली सय्यद यांचे दुबई आणि पाकिस्तान ही कनेक्शन आहे.

राज्यपाल यांना पदावरून लवकर हटवावे आणि आर्थिक गुन्हे शाखेने या ट्रस्टची चौकशी केली नाही, तर उपमुख्यमंत्र्यांच्या निवसस्थानासमोर आत्मदहन करण्याचा दीपाली सय्यद यांचे माजी स्वीयसहाय्यक भाऊसाहेब शिंदे यांना इशारा दिला आहे.
सिने अभिनेत्री दिपाली भोसले-सय्यद फॉऊंडेशन कडून 2019 ला सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त साठी 5 कोटी रुपयांची मदत दिल्याचं जाहीर करण्यात आलं होतं. सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी करून दीपाली यांनी लोकांची भेट घेतली होती. यावेळी पूरग्रस्त भागातील 1 हजार मुलीच्या लग्नाची जबाबदारी घेतल्याच अभिनेत्री दिपाली भोसले -सय्यद यांनी जाहीर केलं.

प्रत्येक मुलीच्या नावाने 50 हजार रुपये ची मुदत ठेव पावती करण्यात येणार आहे, अस जाहीर करण्यात आलं होतं. त्यांनतर सिनेअभिनेत्री दीपाली भोसले-सय्यद यांच्या ट्रस्टतर्फे सांगली जिल्ह्यातील एक हजार मुलींचे सामुदायिक विवाह आणि एक हजार मुलींच्या नावे सुकन्या साहाय्य योजनेच्या माध्यमातून 50 हजारांची ठेव ठेवण्यात आली आहे. त्यातील पाच मुलींना 9 सप्टेंबर 2021 रोजी राज्याचे राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते ठेव पावतीचे वितरण करण्यात आले. मात्र ह्या कार्यक्रमा वरूनच गंभीर आरोप केले जात आहेत.

9 सप्टेंबर 2021 रोजी राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि दीपाली सय्यद यांनी बोगस लग्न लावली. त्यांनी 2016 लग्न झालेल्या एका दाम्पत्याचं माहिती दिली. त्यांच्या मुलाचे जन्म दाखले दाखवले. या दाम्पत्याला 2018 मध्ये मुलही झालं, तरी कोश्यारी आणि सय्यद यांनी पुन्हा चॅरिटेबल ट्रस्टअंतर्गत त्यांचे लग्न लावले. दीपाली सय्यद यांच्यावर राज्यपाल एवढे का मेहरबान आहेत ? याची चौकशी व्हावी अशी मागणी भाऊसाहेबांनी केली आहे.