सुहाना खान आणि अगस्त्य नंदाचा नाईट क्लबमधील 'तो' व्हिडीओ समोर...

Suhana Khan Agastya Nanda Video : सुहाना खान आणि अगस्त्य नंदाचा नाईट क्लबमधील व्हिडीओ होतोय व्हायरल...  

दिक्षा पाटील | Updated: Jun 29, 2024, 10:24 AM IST
सुहाना खान आणि अगस्त्य नंदाचा नाईट क्लबमधील 'तो' व्हिडीओ समोर...  title=
(Photo Credit : Social Media)

Suhana Khan Agastya Nanda VIDEO : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानची लेक सुहाना खाननं द आर्जिच या चित्रपटात पदार्पण केलं होतं. सुहाना ही फक्त अभिनेत्री नाही तर त्यासोबत दोन ब्यूटी बँड्सचा फेस देखील आहे. सुहाना ही अमिताभ बच्चन यांची नात अगस्त्य नंदासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा गेल्या बऱ्याच काळापासून रंगत आहेत. खरंतर, त्या दोघांनी कधी या गोष्टीला नकार दिला नाही, पण नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणानिमित्तानं ते एकत्र स्पॉट होतात. आता देखील तसंच काहीसं झालं आहे.

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत सुहाना खान आणि अगस्त्य नंदा एका नाईट क्लबमध्ये असल्याचे दित आहे. तर यावेळी ते दोघं काही बोलताना दिसत आहेत. अगस्त्यनं काळ्या रंगाचं टी-शर्ट परिधान केलं असून तो सुंदर दिसत आहे. तर दुसरीकडे सुहानानं पांढऱ्या रंगाचा टॅन्क टॉर आणि जिन्स परिधान केली आहे. सुहानाचा कॅज्युअल लूक नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरला आहे. ते दोघं एकत्र आनंदी दिसत आहेत. अनेक रिपोर्ट्सनुसार, सुहाना खान एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी काही काळ लंडनला राहणार आहे. तर रिपोर्ट्सनुसार, अगस्त्य आणि सुहाना हे वेदांत महाजनचा वाढदिवस साजरा करण्यासाठी पोहोचले होते. त्यांच्यासोबत यावेळी निसा देवगण देखील स्पॉट झाली.

'द आर्चिज'च्या सेटवर सुरु झाली लव्ह स्टोरी!

रिपोर्ट्सनुसार, 'द आर्चिज' या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान, दोघांमध्ये चांगली मैत्री झाली आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. एका सुत्रानुसार, त्या दोघांच्या कुटुंबाला त्यांच्या नात्याविषयी माहिती आहे. त्यांना वाटलं की काही काळासाठी असलेला हा फ्लिंग असेल पण ते पुढे सीरियस झाले. याआधी असं देखील म्हटलं गेलं की अगस्त्य क्रिसमस संपूर्ण कुटुंबासोबत असलेल्या लंचसाठी सुहाना खानला घेऊन गेला. दरम्यान, रिपोर्ट्सनुसार, श्वेता बच्चननं त्यांच्या नात्याला कबूली दिली आहे. 

हेही वाचा : 'स्त्रीया दोन नवरे हवेत असं म्हणतील तेव्हा...', अरमान मलिकच्या 'प्रत्येक पुरुषाला दोन पत्नी हव्या' वक्तव्यावर संतापली अभिनेत्री

दरम्यान, या आधी 'बॉलिवुडलाइफ' च्या एका रिपोर्टनुसार, असं म्हटलं होतं की अगस्त्य आणि सुहानाला त्यांच्या नात्याला विषयी काही चर्चा व्हावी असं वाटतं नाही कारण त्यामुळे सगळ्यांचं लक्ष त्यांच्या प्रोफेशन्ल आयुष्याकडे न जाता खासगी आयुष्याकडे जातं. त्यांना लोकांच्या नजरेपासून देखील लांब रहायचं आहे. त्यामुळेच सुहानानं तिच्या गाडीच्या खिडक्यांवर काळ्या रंगाचे पडदे लावले आहेत.