Petrol Diesel Price Today: मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मान्सूनने शहरात हजेरी लावल्यानंतर आता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीतही घट झाली आहे. शुक्रवारी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केला. त्याचवेळी त्यांनी मुंबई आणि महानगर प्रदेशात इंधनावर लागणारा करात (VAT) कपात करण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर आजपासूनच हे नवे दर लागू करण्यात येणार आहेत.
महाराष्ट्रात पेट्रोल 65 पैसे प्रति लीटर आणि डीझल 2.60 रुपये प्रति लीटर स्वस्त झाले आहे. VAT लागल्यामुळं प्रत्येक राज्यात इंधनाच्या किंमतीत फरक पडतो. त्यामुळंच देशातील विविध राज्यात इंधनाच्या किंमतीत चढ-उतार होत असतात. व राज्यातील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीदेखील वेगवेगळ्या असतात. तसंच, आंतरराष्ट्रीय बाजारातदेखील कच्च्या तेलाच्या किंमतीत चढ-उतार होत असतात. आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूड 86.41 डॉलर प्रति बॅरेल आहे. तर, WTI क्रूड 81.54 डॉलर प्रति बॅरलवर व्यवहार करत आहे. तेच भारतातील सरकारी तेल कंपन्यांनी आज 29 जून 2024 रोजी सर्व महानगरातील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती स्थिर ठेवल्या आहेत.
- देशाची राजधानी दिल्लीमध्ये एक लीटर पेट्रोलची किंमत 94.76 रुपये आणि डीझेलची किंमत 87.66 रुपये प्रति लीटर आहे.
- तर, देशाची आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोलची किंमत 103.43 रुपये प्रति लीटर आणि डिझेलची किंमत 89.95 रुपये प्रती लिटर आहे.
- कोलकत्ता येथे पेट्रोलची किंमत 103.93 रुपये प्रति लीटर आणि डीझेल 90.74 रुपये प्रती लिटर आहे.
- चेन्नईमध्ये पेट्रोलची किंमत 100.73 रुपये प्रति लीटर आणि डिझेलची किंमत 92.32 रुपये प्रति लीटर इतकी आहे.